गुंठेवारी विधेयक: सभागृहात स्पष्ट मतप्रदर्शन
Автор: Suresh Dhas
Загружено: 2025-12-09
Просмотров: 322
Описание:
महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील अनियमित गुंठेवारी नियमित करण्यासंदर्भातील विधेयकावर चर्चा होत असताना , सभागृहात माझी भूमिका स्पष्टपणे मांडली.
हे विधेयक निश्चितच चांगले असून अनेक नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांना दिलासा देणारे आहे, परंतु आरक्षणाच्या जागांवरील चुकीच्या पद्धतीने झालेल्या गुंठेवारीला नियमित करणे म्हणजे चुकीच्या लोकांच्या पाठीशी उभे राहण्यासारखे ठरेल, ही माझी स्पष्ट भावना आहे. तहसीलदार आणि जिल्हाधिकारी स्तरावर काही ठिकाणी मंजुरी देताना त्रुटी झालेल्या आहेत आणि त्याचाच फायदा घेत काही एजंटांनी नगरपंचायत, नगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीत खेळाचे मैदान, शाळेच्या जागा आणि डीपी प्लॅनमधील विविध आरक्षित जमिनींचेही प्लॉट करून ते नियमित करण्याचे प्रस्ताव एसडीएमपर्यंत नेले आहेत. अशा प्रकारे शहराच्या विकास आराखड्याला बाधा पोहोचवणाऱ्या आणि सार्वजनिक हिताच्या जागा हिरावून घेण्याच्या पद्धतीला राज्याने कोणत्याही परिस्थितीत कायदेशीर संरक्षण देऊ नये, असे मी सभागृहात ठामपणे नमूद केले.
या पार्श्वभूमीवर शासनाने या विधेयकाची अंमलबजावणी करताना स्पष्ट अधिसूचना जारी करून नगरपंचायत किंवा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची (CEO) अनिवार्य NOC घेतल्याशिवाय शहर क्षेत्रातील कोणतीही गुंठेवारी नियमित करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी मी सरकारकडे केली. ही भूमिका नागरिकांच्या हितासाठी असून, शहरांचा नियोजित विकास, सार्वजनिक सुविधा आणि भावी पिढ्यांचा अधिकार अबाधित राहावा, हा यामागचा मुख्य हेतू आहे.
#विधिमंडळअधिवेशन #गुंठेवारीनियमितीकरण #SureshDhas #सार्वजनिकहित #शहरविकास #डीपीप्रणाली #आरक्षणजमिनी #उत्तरदायीशासन #MaharashtraLegislature #UrbanDevelopment
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: