🤗| मार्गशीर्ष गुरुवार पूजा कशी करावी? संपूर्ण साहित्य आणि पूजा विधी! 🙏
Автор: Sakhi
Загружено: 2025-11-28
Просмотров: 324
Описание:
मार्गशीर्ष गुरुवार पूजा साहित्य यादी (तपशीलवार आणि अंतिम)
१. मांडणी आणि स्थापना:
आसन: देवघरासाठी छोटा चौरंग किंवा लाकडी आसन (यावर लाल/पिवळे वस्त्र अंथरलेले).
कलश: तांब्याचा/पितळेचा कलश (पाण्याने भरलेला).
कलशामध्ये टाकलेले साहित्य: दुर्वा, तुळशीपत्र, फुले, नाणे आणि सुपारी.
नारळ (श्रीफळ): कलशावर ठेवण्यासाठी एक नारळ
पाच झाडांचे डहाळे किंवा पाच पाने: कलशावर ठेवण्यासाठी
गणपती बाप्पाचं प्रत्येक म्हणून दोन पानांचा वेढा त्यावर नाण आणि सुपारी ठेवायची आहे.
देवीची प्रतिमा: श्री महालक्ष्मी मातेचे टाक, प्रतिमा किंवा सचित्र पुस्तक.
२. देवीची ओटी (विशेष):
ओटीचे सामान: ब्लाउज पीस, हळद-कुंकू, नारळ, फळे, सुका मेवा, तांदूळ (मुठभर).
फुले: पूजेसाठी आणि ओटीसाठी विविध प्रकारची फुले.
३. पूजेची सामग्री (आरती थाळी):
दीप/आरती: मातीचा किंवा धातूचा दिवा (निरंजन).
सुगंध: धूप आणि कापूर (पूजेच्या वेळी प्रज्वलित करण्यासाठी).
टीका/अक्षता: हळद, कुंकू, अक्षता,
४. नैवेद्य:
फळे: केळी आणि पाच फळे.
प्रसाद: दूध/दही, तसेच गोडाचा नैवेद्य.
💡 सर्वात महत्त्वाची टीप:
जसे आपण स्वतःला जेवण्यासाठी ताट घेतो, त्याबरोबर पाणी ठेवतो, तसेच आज महालक्ष्मी माता आपल्या घरी आली आहे हे समजून!
देवीला नैवेद्य दाखवताना, एका छोट्या तांब्यात किंवा ग्लासामध्ये पिण्यासाठी पाणी नक्की ठेवावे आणि ते पाणी दिवसभर तसेच ठेवावे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवी आपल्या घरातच वास्तव्य करत आहे असे समजून घरातलं वातावरण आनंदी, सकारात्मक आणि शांत ठेवायचे आहे.
जेणेकरून माता लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात नेहमीसाठी वास्तव्य करेल आणि तुमच्यावर तिची कृपा राहील! 🙏
#Margashirsha2025
#LakshmiPuja (लक्ष्मी पूजा)
@sakhii24
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: