Maharashtra Kesari Gorakh Sarak's Wishes for the 66th Maharashtra Kesari Kusti Spradha 2025
Автор: Maharashtra State Wrestling Association
Загружено: 2025-03-22
Просмотров: 2255
Описание:
१९९८ सालची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पुन्हा एकदा विदर्भातील नागपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. यावर्षी महाराष्ट्र केसरीच्या गदेचा मान सातारा जिल्ह्याला मिळाला होता. साताऱ्याचे पैलवान गोरख सरक यांनी महारष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावावर केला होता. पैलवान गोरख सरक हे फलटण तालुक्यातलं मिरगावचे रहिवाशी होत. ज्या गावात दरवर्षी उहाळ्यात दुष्काळाच्या झळा लोकांना सहन कराव्या लागत होत्या. मात्र पैलवान गोरख सरक यांनी या सगळ्या झळा सोसून कुस्ती क्षेत्रात आपला एक कीर्तिमान स्थापित केला होता. गरिबीवर मात करून फक्त आपल्या मनगटाच्या जीवावर पैलवान गोरख सरक हे 1998 सालचे महाराष्ट्र केसरी झाले होते. १९९८ च्या या स्पर्धेत महाराष्ट्राचे सव्वाशे किलो वजनाचे नामांकित पैलवान उतरत असतात. त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सातारच्या या पैलवानानं फक्त 78 किलो वजन असताना सुद्धा महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरलं होतं. त्यांची ही गोष्ट आज खरंतर अनेकांसाठी प्रेरणादायी आहे, असे अनेक नवीन मल्ल यावर्षीच्या महाराष्ट्र केसरीत देखील आपल्याला पाहायला मिळतील. याच महाराष्ट्र केसरी पै.गोरख सरक यांच्याशी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या टीमने संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या कुस्तीची सुरवात आणि प्रवास या जुन्या आठवणी मांडल्या. तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील आठवणींना उजाळा दिला...!
आता यावर्षी महाराष्ट्र केसरीचा किताब कोणाला मिळणार याबाबत अखंड महाराष्ट्रभर उत्सुकता लागून राहिलेली आहे. स्पर्धेसाठी आता काही दिवस उरलेत. यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कर्जत जि. अहिल्यानगर या ठिकाणी २६ ते ३० मार्च दरम्यान आयोजित केली आहे. मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कुस्तीच्या कुंभमेळ्याचा आनंद घ्या.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: