Ambabaichi Aarati | Nidra Kari Manchi | निद्रा करी मंची
Автор: Kimaya Naik
Загружено: 2019-01-25
Просмотров: 168031
Описание:
निद्रा करी मंची....
निर्गुण निश्चल निष्कल जे ते तू त्रिगुणा
सर्वसाध्या म्हणती तुजला जन सगुणा
दिसते जग तव अंगी मणी गण जेवी गुणा
जाणुनी योगी मुनीजन जाणती याची खुणा
जयदेवी जयदेवी जय चित्सुखसदने
जय करवीर निवासिनी कमले शशिवदने
जय देवी जय देवी....
फिरती रवी शशी गगनी परी अंबुद वृष्टी
तुझेनी आज्ञे निर्मित कमलोद्भव सृष्टी
कमलाकर हर वांच्छित त्वत्करुणा दृष्टी
त्वत्कर लेखन हरी हर विधी जा अदृष्टी
जय देवी जय देवी....
मस्तकी लिंग महिधर हस्तकी दिव्य गदा
खेटक हाटक पात्रक मातू:लिंग सदा
विलसे श्रीमुख सुंदर पाहाता मोद मदा
वारुनी दे सुख शाश्वत भव भय नाही कदा
व्युत्पत्ती गर्व विसरुनी जे तत्पद जे ध्याती
तत्पर होता सत्पदी चित्पद ये हाती
उत्पत्ती प्रलयाविरहित अखंड जे राहती
तत्पद शंकरनंदन स्तवितो दिनराती
जयदेवी जयदेवी जय चित्सुखसदनी
जय करवीर निवासिनी कमले शशिवदने
जय देवी जय देवी....
निद्रा sssssssssss करी मंची...
जगदंबे sssss
भाविक भक्त कदंबे
निद्रा करी मंची
साधन चतूष्टय हूरचार
गाथे अर्थ रुचिर
लिहीला सत्संगे
सुंदर श्रद्धा तुलीवर ।। निद्रा करी मंची
अद्वय भक्ती हे कुसुमाली
अंबेवर अस्तरली
अद्भुत बोध उशी
लघुतुली विवेक विरक्तें भरली ।। निद्रा करी मंची
अनुभव दीपम् हा सोज्वळ
अभ्यास हे तैल
वाती अहं ममता
प्रकाश भासे अपगत मल ।। निद्रा करी मंची
षड्रिपु सुपारी फोडून
सत्वात्मक मन पान
अहंता जाळून
लावीयले जगदंबेवरी चूर्ण ।। निद्रा करी मंची
शुद्ध बुद्धी हे जायफळ
लवंग तुर्या विमल
सत्व हा खदिर अति धवल
अर्क गुणांचा निर्मळ ।। निद्रा करी मंची
अंबे तांबूल
हा घेणे सर्वाज्ञा देणे
श्रीराम चरण सह शयने
विनवी नारायण । निद्रा करी मंची
जगदंबे ssss
भाविक भक्त कदंबे
निद्रा करी मंची
(राम राम राम हरे राम राम राम )....४
हरे
नारायणी नारायणी नारायणी..... १८
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: