नेसली गं बाई चंद्रकळा टिपक्याची... श्री मिसाळ गुरूजी आणि गीतार्थ पाठाचे सहाध्यायी आळंदी.
Автор: Misal Guruji Bhajan Alandi
Загружено: 2023-11-07
Просмотров: 38781
Описание:
नेसली ग बाई मी चंद्रकला ठिपक्यांची..
नेसली ग बाई मी, चंद्रकळा टिपक्यांची,
बाई ठिपक्याची, बाई ठिपक्याची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या कृष्णाची llधृll
शिट्टी मारून करतो गोळा, गोपाळांचा मेळा,
कुणीकडून आला बाई, मिठी मारतो गळा,
शर्त झाली बाई याच्या निर्लजपणाची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या कृष्णाची ll१ll
घागर बुडविता, आला पाठोपाठ,
पदर हा ओढी बाई, कृष्ण कसा धीट,
सोड सोड देवा आता,नार आहे परक्याची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या कृष्णाची ll२ll
एका जनार्दनी, गवळण हसली,
हरि चरणाला, मिठी मारिली,
फिटली रे देवा,शंका मनाची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या हरीची,
तिरपी नजर माझ्यावर ह्या सावळ्या कृष्णाची ll३ll
****************************************************
गायक/संवादिनी... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला... श्री अर्जुन लंघे.
तानपुरा... डिजिटल तानपुरा मास्टर.
टाळ/कोरस...श्री गायकवाड शिवराज, संदीप महाजन, रंजित चाटे
चिपळी... श्री कुंडलिक बिरादार.
कॅमेरा शुटींग..सौ.पुष्पा मिसाळ.
****************************************************
आयोजक ...गीतार्थ पाठ,
माऊली पार्क,करवाधर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
****************************************************
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: