खापरा उत्सव ! खापरा नारूर ! narur Chi Mahalakshmi ! Kudal Narur
Автор: Dodamarg Vlogs
Загружено: 2023-06-02
Просмотров: 16894
Описание:
Note - Video information and video link is given below. You can watch the rest of my videos.
Follow me social media
Facebook :- / swaraj.aeer.3
Instagram :- / swarajaeer
Twitter :- / aeerswaraj
Hi
I am swaraj aeer Welcome to Our YouTube Channel Dodamarg Vlogs
About This Video
[ या Video बद्दल माहिती ]
कुडाळ तालुक्यातील माणगांव खो-यातील नारूर हे गाव श्री महालक्ष्मी मंदिर व खापरा उत्सव यासाठी प्रसिद्ध आहे. खापरा उत्सव हा दोन वर्षांनी एकदा येतो. या उत्सवाला राज्यातूनव तसेच परराज्यातून असंख्य भाविक येतात. रांगणागडाच्या पायथ्याशी असलेले नारूर गाव प्रसिद्ध आहे. या गावातील खापरा या प्रसिद्ध उत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील व गोव्यातील भाविक मोठया संख्येने उपस्थित राहतात. या उत्सवानंतर जैतिर (तुळस-वेंगुर्ले) येथील उत्सवाची सुरुवात होते. या विज्ञान युगातही माहेरवाशिणी महिला उत्सवासाठी येऊन खाप-यासमोर आपली गा-हाणी मांडतात. हा देव जागृत व नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध असल्याने सर्वांची मनोकामना पूर्ण होते.
फार-फार वर्षापूर्वी जैतिर-तुळस येथील जैते-परब यांची मुलगी घाटमाथ्यावर होती. ते आपल्या मुलीला भेटण्यासाठी चालत घाटमाथ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत दांडेकर होता. जैते-परब हे वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांना मुलीकडच्या लोकांनी येताना भेट म्हणून द्रव्य दिले. ते घेऊन येताना त्यांना गडावरील भागातच मारहाण झाली. द्रव्याच्या हव्यासापोटी दरोडेखोरांनी त्यांना मारले. परंतु, अत्यवस्थ परिस्थितीतही ते दांडेकरांच्या मदतीने नारूर गावापर्यंत आले. नारूर येथील सुद्रीक यांच्या घराकडे आल्यानंतर त्यांनी पाण्यासाठी याचना केली. त्यांना सुद्रीक यांच्या घरातील एका वृद्ध महिलेने पाणी दिले. पाणी प्यायल्यानंतर जैते-परब यांचे त्याच ठिकाणी निधन झाले. तेच जैते-परब आता संचार स्वरुपात या सुद्रीकांच्या घरातील पुरुषावर उभे राहतात. नारूर गावातील मानकरी मंडळी व सुद्रीक यांच्या सहकार्याने या उत्सवाची सांगता केली जाते. सुद्रीक यांच्या घरी जैते-परबांना मरण आल्याने या उत्सवापूर्वी सात दिवस विधिवत कार्य केले जाते. हा उत्सव प्रत्यक्षात दीड दिवसच साजरा केला जातो. गावकर मंडळी व सुद्रीक घराणे यांच्या सहकार्याने या उत्सवाला भाविक मोठया संख्येने उपस्थित राहून आपले नवस फेडतात. बकरा, कोंबडी, तेल, नारळ अशाप्रकारे वस्तूरूपात नवस फेडले जातात. बक-या -कोंबडयांचा बळी दिला जात नाही. हातात तलवार, डोक्यावर लाकडी रुपडे व फुलांचे हार घातले जातात. हा संचार एवढा भयंकर असतो की दो-यांनी या संचार उभा राहणा-याचे हात बांधले जातात. तलवारीसमोर ढाल घेऊन गावकरी मंडळी असतात. तलवारीचा वार ढालीवर झेलला जातो. शुक्रवारी दुपारी या कार्यक्रमानंतर ताबडतोब नारूर सीमेबाहेर जाऊन नैवैद्य केला जातो. नैवैद्य दाखवून गा-हाणे केल्याशिवाय जैतीर-तुळस येथील कार्यक्रम चालू होत नाही, अशी या देवस्थानाची कथा आहे.
like .share. subscribe & and select All by pressing the bell.
My Other Vlog Video link [ Must Watch ]
बाकी Videos बघण्यासाठी या लिंक वर क्लीक करा
Song : The background music in the video is taken from YouTube Music Library
[ No attribution is required. ]
#Dodamargvlogs #khaparautsavnarur #kudalnarur #narurmahalakshmi #narur
Thank You !!!!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: