राष्ट्रीय सह.शि.प्र.मंडळ सभासद नोंदणी बाबत महत्त्वाची अपडेट | आमदार मंगेश चव्हाण यांचे आवाहन
Автор: MLA Mangesh Chavan - आमदार मंगेश चव्हाण
Загружено: 2026-01-30
Просмотров: 15953
Описание:
विनम्र आवाहन...
चाळीसगाव तालुक्यातील तळागाळातील बहुजन समाजात शिक्षणाची गंगा पोहचविण्यासाठी तालुक्याचे भाग्यविधाते स्व.रामराव जिभाऊ यांच्यासह तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिक यांनी उदात्त हेतूने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ लिमिटेड संस्थेची विद्यमान चेअरमन व संचालक मंडळाने गुपचूपपणे नवीन सभासद नोंदणी करून सभासदांचा विश्वासघात केला असून ही संस्था प्रायव्हेट लिमिटेड करण्याचा घाट घातला आहे. याविरोधात सर्व चाळीसगाव तालुक्यात जनक्षोभ उसळला आहे. दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी "रावि बचाव" चा नारा देत सर्वपक्षीय, विविध क्षेत्रातील नागरिक एकत्र आले होते. त्यांनी केलेल्या विनंतीवरून व संस्थेविषयीच्या जनभावना लक्षात घेत मीदेखील या संघर्षात त्यांच्यासोबत उभा राहण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रीय सह.शि.प्र.मंडळ संस्था वाचवण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांना संस्थेत सभासदत्वाचा अधिकार मिळावा यासाठी सर्व स्तरावरील लढाई व संघर्ष करावा लागणार असून पहिल्या टप्प्यात आपण लोकशाही व सनदशीर मार्गाने रीतसर नवीन सभासद नोंदणी अर्ज संस्थेकडे देणार आहोत.
यासाठी इच्छुक व पात्र नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थित भरून त्यासोबत ५०१ रुपये सभासद व वर्गणी फी चा डीडी जोडावा. तसेच भविष्यात मा.न्यायालयात जावे लागल्यास सोबत वकील पत्रावर देखील सही करून ते माझ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील कार्यालयात जमा करावे. यासाठी आपल्या सोयीसाठी स्वतंत्र मदत कक्ष स्थापन करण्यात आला आहे याची नोंद घ्यावी.
किंवा सभासद आपला अर्ज व डीडी राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळ कार्यालय, अंधशाळा चौक, भडगाव रोड, चाळीसगाव येथे रजिस्टर पोस्टाने देखील पाठवू शकतात, संस्थेने आपली रजिस्टर पोस्ट पावती व अर्ज पोस्टातून परत आल्यास अर्जाची प्रत घेऊन मा.जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था (डीडीआर) कार्यालयाकडे आपली अपील दाखल करावी.
माझे सर्वांना आवाहन आहे की, राजकीय मतभेद, गट तट बाजूला ठेवून राष्ट्रीय सह.शि.प्र.मंडळ
संस्था वाचविण्यासाठी व वंचितांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे ही विनंती, धन्यवाद..!
• आमदार मंगेश रमेश चव्हाण
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: