श्रीरामपूरमध्ये उद्या भव्य मोर्चा|न्यायासाठी निलेश शेंडगे प्रकरणी आरोपींना अटक करण्याची जोरदार मागणी
Автор: SRB NEWS LIVE
Загружено: 2026-02-19
Просмотров: 1701
Описание:
स्वर्गीय निलेश एकनाथ शेंडगे यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी श्रीरामपूर येथे भव्य न्याय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज, स्व. निलेश (मामा) शेंडगे मित्र परिवार, शिव प्रहार प्रतिष्ठान व विराट प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ११ जानेवारी २०२६ रोजी घडलेल्या हत्याकांडातील मुख्य आरोपी नगरसेवक अर्जुन दामाडे व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. न्याय मिळावा आणि दोषींना लवकरात लवकर अटक व्हावी, यासाठी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
हा भव्य मोर्चा दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्रीरामपूर येथील भगतसिंग चौकातून सुरू होणार असून गिरेस चौक, छत्रपती शिवाजी महाराज रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी टॉकीज रोड मार्गे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत जाणार आहे.
मोर्चाद्वारे स्व. निलेश शेंडगे यांना श्रद्धांजली अर्पण करत न्यायासाठी एकजूट दाखवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून न्यायाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
#BreakingNews #Shrirampur #Ahilyanagar #JusticeForNileshShendge
#ShrirampurMorcha #NyayMorcha #MaharashtraNews #LiveNews
#MarathiNews #LatestNews #MaharashtraBreaking #JusticeDemand
#PublicProtest #HinduSamaj #ShrirampurNews #AhilyanagarNews
#TrendingNews #NewsUpdate #MarathiBreakingNews #LiveUpdate
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: