भक्त चांगुणा पाळणा Bhakt changuna palana
Автор: Tai bhimrao kalel
Загружено: 2026-03-03
Просмотров: 936
Описание:
शिवभक्त चांगुणा ही श्रीयाळशेठ यांची पत्नी आणि भगवान शंकराची निस्सीम भक्ती करणारी एक पौराणिक व्यक्तिरेखा आहे.
त्यांच्या भक्तीची परीक्षा घेण्यासाठी शंकराने साधूच्या रूपात येऊन त्यांचा पुत्र चिलयाबाळ याचा बळी मागितला होता.
जो त्यांनी भक्तीपोटी दिला, परंतु अखेरीस शंकराने प्रसन्न होऊन चिलयाबाळाला जिवंत केले.
या कथेत चांगुणाने आपल्या पतीला या कठीण परीक्षेत साथ दिली होती.
त्यामुळे तिला एक आदर्श शिवभक्त मानले जाते.
पौराणिक कथा आणि शिवलाल अमृत या ग्रंथामध्ये भगवान श्री शंकर यांनी त्यांचे निस्सीम, दानशूर, श्रद्धाळू भक्त यांची सत्व परीक्षा घेतली होती. सत्व परिक्षा पहाण्यासाठी त्यांनी एका साधुबाबाचे रूप घेतले होते. ही १३९६ ते १४०७ या कालावधीतील एक सत्य घटना आहे.

पौराणिक कथामध्ये श्रीयाळ शेठ नावाचा एक राजा होता. तो भगवान शंकरांचा निःसीम भक्त होता. देवाच्या कृपेने त्याच्याकडे सर्व काही व्यवस्थित होते. त्याची चांगुणा नावाची राणी होती.
या राजा-राणीला चिलया नावाचं एकुलतं एक बाळ होतं. श्रीयाळ-शेठ आणि चांगुणा राणी हे आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला अन्नदान करीत. त्यांच्याकडे येणारी कोणतीही व्यक्ती कधीच उपाशी जात नसे. आणि हे राजा-राणी आपल्याकडे येणाऱ्या प्रत्त्येक व्यक्तीला जे हवं ते उपलब्ध करून देत असत. कधीही कोणाला न दुखावता आणि उपाशी न ठेवता त्यांची अन्नाची अपेक्षा पूर्ण करत असत.
एकदा भगवान शंकरांनी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवलं. आणि एका साधूबाबाचं रूप घेऊन त्यांच्या घरी भिक्षेसाठी आले. श्रीयाळ-शेठ राजा हा जातीने वाणी होता आणि शुद्ध शाकाहारी होता. पण ह्या साधूबाबाने "मला नरमांस हवे" अशी इच्छा बोलून दाखवली.

श्रीयाळ शेठ राजाचा नियम होता कि दारी येणारा कोणताही वाटसरू उपाशी जाता कामा नये. मग नर-मांसाची उपलब्धता करत असताच पुन्हा एकदा साधूने मागणी केली कि मला तुझ्या बाळाचेच मांस हवे. मग मात्र चांगुणा राणीवर दुःखाचा डोंगर पसरतो. पण तरीही अन्नदानाचा नियम मोडू नये आणि आपल्या घरून कोणी उपाशी जाऊ नये यासाठी मुलाचं धड आणि शीर वेगळं करते.
एकुलत्या एक बाळाची आठवण म्हणून बाळाचं कांडण केलेलं शीर ती बाजूला काढून ठेवते. फक्त धडाचे मांस शिजवते. जेव्हा ते साधू पुढे आणलं जातं तेव्हा त्याच्या लक्षात येतं कि चांगुणा राणीने शीर बाजूला काढून ठेवलं आहे . ताटामध्ये वाढून आणलेलं मांस हे फक्त धडाचं आहे.
पुन्हा एकदा क्रोधीत होऊन साधू उठू लागतो कि तुम्ही माझी फसवणूक करीत आहात म्हणून. मग श्रीयाळ-शेठ राजा आणि राणी त्या साधूचे पाय धरतात , माफी मागतात. ते साधुबाबाची करुणा भाकतात . हे शिव शंभो, हे भगवंता आता आमची किती परीक्षा पाहणार आहेस. मग चांगुणा राणी जाउन ते शीर कांडण करून शिजवुन साधूला आणून देते.
राजा-राणी बोलतात कि हे साधू आता तरी आमचं सत्त्व राख आणि हे भोजन ग्रहण करा. तेव्हा साधु म्हणतात, यजमानाने पण अतिथी बरोबर एका पंक्तीत अन्न भक्षण केले पाहिजे. हे ऐकून श्रीयाळ यांना मुलाचे मांस कसे भक्षण करावे, त्यामुळे तेवढ्यात चांगुणा सांगते, अहो बरोबर आहे, तुम्ही पण बसा…!
श्रीयाळ साधु बरोबर पंक्तीत बसतात. तेव्हा साधु ताडकन उभे राहतात, आणि मी निपुत्रिकाच्या गृही अन्न सेवन करीत नाही, असे म्हणून प्रस्थान करायला लागतात. तेव्हा चांगुणा त्यांच्या पायाला मिठी मारते.
साधूबाबा (भगवान शंकर) त्यांचा त्याग पाहून प्रसन्न होतात. नंतर राजा-राणीला सांगतात कि मी तुमची भक्ती पाहून प्रसन्न झालो आहे . चांगुणेला विचारतात कि तू मला हव ते शिजवून घातलस, तुला काय हवा तो इच्छित वर माग.
ती बिचारी आई पोटचं एकुलतं एक बाळ गेल्याच्या विरहाने हंबरडा फोडते . चिलया बाळाला मोठमोठ्याने हाका मारते, साधूबाबाला म्हणते कि लोक आता मला वांज म्हणतील. हा कलंक मला लागेल. माझा हा कलंक तू धुऊन टाकू शकतोस का? ….
पाहते तर काय… चिलया बाळ समोरून धावत येते आणि आईला बिलगते. मग भगवान शंकर खरं रूप धारण करतात. त्या दोघांना दर्शन देतात. दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो.
श्रीयाळ-शेठ राजा आणि चांगुणा राणी साक्षात भगवंतांच्या दर्शनाने धन्य पावतात. भगवान शंकर मग सांगतात कि तुमची परीक्षा घ्यायला मी आलो होतो . तुमची भक्ती अगाध आहे. अशा या भगवान शंकर भक्ताचं म्हणजेच श्रीयाळ शेठ राजाचं राज्य फक्त साडेतीन घटकांचं होतं. म्हणून ह्या राजाला औट घटकेचा राजा असं संबोधलं जातं. औट घटकेचा राजा हा शब्दप्रयोग बारा वर्षांच्या दुर्गादेवीच्या दुष्काळात (१३९६-१४०७) शिराळशेठीने लोकांना केलेल्या प्रचंड मदतीने खूष होऊन बहामनी राजाने त्याला पाहिजे ते मागायला सांगितल्यावर त्याने औट(साडेतीन) घटकांंसाठी सिंहासनावर बसून राज्यकारभार करू द्यायची मागणी केली. ती मागणी बहामनी राजाने मान्यही झ त्याने राज्याचे पुर्ण भांडार दान धर्म करून..............
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: