जितेंद्र भावे आणि महेंद्र जेजूरकर यांनी live गॅस चोरी पकडली . सावध व्हा आपली टाकी मोजून घ्या .
Автор: Soma Kurhade (socialtravellographer)
Загружено: 2025-09-23
Просмотров: 17837
Описание:
तपोवनात गॅस सिलेंडर घोटाळा उघड.
तपोवनात, कपिला संगमजवळ, कोठुळे मळ्यात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधून गॅस काढून तो कमर्शियल टाक्यांमध्ये भरणे, तसेच घरगुती गॅस सिलेंडर मधून एक किलो ते चार किलो गॅस काढून तो कमर्शियल टाक्यांमध्ये भरून कमर्शियल टाक्या बाजारात विकणे असा गोरख धंदा येथून सुरू होता.
एक नवे दोन नवे दररोज 15 ते 20 गाड्या येथे घरगुती गॅस सिलेंडरच्या येतात आणि त्यामधील गॅस काढण्याचे काम आणि त्याला कमर्शियल सिलेंडर मध्ये भरण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू होते. या गोरख धंद्यामुळे सामान्य ग्राहकाची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती. सामान्य ग्राहकाला सिलेंडर मागितल्यावर महिना महिना सिलेंडर मिळत नव्हते. एक सिलेंडर मधील दोन ते चार किलो कमी भरणारा गॅस हा प्रत्येक गृहिणीच्या डोक्याला ताप ठरत होता. हे सिलेंडर वाहतूक करणारे लोक कधीही सिलेंडर मोजून देत नाहीत. त्यामुळे यातील चोरी जात असलेला गॅस ग्राहकाच्या लवकर लक्षात येत नाही.
अशाप्रकारे रेड करून प्रत्यक्ष साइटवर मोठ्या प्रमाणावर सिलेंडर पकडण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ आहे. यामधून आता सर्व गॅस एजन्सी धारकांनी आपल्या सिलेंडर वाहतूक धारकांवर कसा अंकुश ठेवायचा हे ठरवणे गरजेचे आहे. अनेकदा गॅस एजन्सी धारकच या गोरख धंद्यात सहभागी आहेत अशी जनतेला खात्री असते.
गॅस धारकांची ही लूट या निमित्ताने आता कुठेतरी थोड्याफार प्रमाणात कमी होईल असे दिसते. आडगाव पोलीस या प्रकरणात किती पारदर्शक आणि प्रामाणिक पद्धतीने काम करतात आणि या टोळीला किती दिवस जेर बंद करून ठेवतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जितेंद्र भाभे (भावे)
संस्थापक अध्यक्ष
निर्भय महाराष्ट्र पार्टी
91 30 87 52 25, 922 57 922 55, 77 208 922 55
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: