Tula Japnar Aahe - तुला जपणार आहे | Title Song with Lyrics | Neeraj G, Pratiksha S, Mahima M | ZM
Автор: Marathi TV Universe
Загружено: 2025-02-07
Просмотров: 851274
Описание:
दिसत नसले तरी असणार आहे, मी तुला जपणार आहे…!
नवी मालिका
'तुला जपणार आहे'
१७ फेब्रुवारीपासून...
सोम-शनि रा. १०:३० वा. Zee मराठीवर..
#TulaJapnarAahe #ZeeMarathi #NewSerial
#MiMarathiZeeMarathi
गायक/गायिका: सावनी रवींद्र, आदित्य नीला
गीतकार: वैभव जोशी
संगीत: कुणाल-करण
Lyrics -
निज बाळा रात्र झाली
दाटतो अंधार आहे
गात अंगाई तुला
जागीच मी असणार आहे
तुला जपणार आहे मी
तुला जपणार आहे
तुझा आधार आहे मी
तुला जपणार आहे
पावसाची सर कधी मी
रेशमी छाया कधी
तू किनारा मी तुझ्या
डोळ्यात झरणारी नदी
ओल मायेची तुला
देऊनी माझ्या फुला
मी सुगंधासारखी
वाऱ्यामध्ये लपणार आहे
तुला जपणार आहे मी
तुला जपणार आहे
तुझा आधार आहे मी
तुला जपणार आहे
संकटे येतील लाखो
धीर तू सोडू नको
पाहशी जे स्वप्न ते
स्वप्नातही खोडू नको
सोसूनी साऱ्या झळा
कर जिण्याचा सोहळा
वाळल्या फांदीस हिरवी
पालवी फुटणार आहे
तुला जपणार आहे मी
तुला जपणार आहे
तुझा आधार आहे मी
तुला जपणार आहे
त्या तुझ्या स्वप्नात माझे
स्वप्न तेवत राहते
अन् तुझे झंकारणे
मौनात माझ्या राहते
सूर सारे रेशमी
छेडताना नेहमी
जो दिला नाही तुला
तो शब्दही सुचणार आहे
तुला जपणार आहे मी
तुला जपणार आहे
तुझा आधार आहे मी
तुला जपणार आहे
सांज ढळता सोबतीला
आठवण येते तुझी
वाटते की तू इथे
आहेस ही नाहीस ही
दुःख डोळे झाकते
पण तरीही वाटते
गर्द अंधारातही
तो चेहरा दिसणार आहे
पुन्हा घडणार आहे हे
पुन्हा घडणार आहे
क्षणाचा भास तू पण
मी तुला जपणार आहे!
Tags:-
#TulaJapnaarAahe #TulaJapanarAhe
#LakshmichyaPaulanni #TharlaTarMag
#SukhMhanjeNakkiKayAsta #StarPravah #Shubhvivah #NewPromo #NavriMileHitlerla #MarathiSerials #MarathiMulgi #MarathiShows #MarathiActress #SaraKahiTichyasathi #LagnachiBedi #TulaShikvinChanglachDhada #Paru #AaiKutheKayKarte #Swabhimaan #Shiva #ZeeMarathi #ColorsMarathi #SonyMarathi #SunMarathi #GharoghariMatichyaChuli #Muramba #PunhaKartavyaAahe #SatvyaMulichiSatviMulgi #AppiAmchiCollector
#ManDhagaDhagaJodteNava #PremachiGoshta
Thanks For Watching Guys...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: