केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी....
Автор: Unmesh Patil - उन्मेश पाटील
Загружено: 2025-10-15
Просмотров: 3595
Описание:
शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी जन आक्रोश मोर्चा समितीने केळी पिक विमा नुकसान भरपाई जगताप दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा करण्याबाबत पाठपुरावा केला होता त्या अनुषंगाने काल पासून शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल बीमा योजना (PMFBY) च्या पोर्टल वर Payable Claim Amount (नुकसान भरपाई क्लेम सेटलमेंटची) मंजूर रक्कम दिसू लागली आहे. याचाच अर्थ की क्लेम अमाऊंट वितरण/ Disbursement प्रक्रिया सुरू होण्यास आता कुठलीही अडचण व अडथळा राहिलेला नाही. या माध्यमातून शेतकऱ्यांना कमी व जास्त तापमान मुळे झालेली नुकसान भरपाई प्रथम टप्प्यात तात्काळ आला होण्याचा मार्ग मोकळा झालेला असून केळी पिक विमा नुकसानीचे पंचनामे जे झाले होते त्याची देखील प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू असल्याचे आम्ही या माध्यमातून आपणास कळवू इच्छितो.
दिवाळीच्या पर्वात शेतकऱ्यांना हक्काची नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आता सुलभ झाला असून आता कुठलीही अडचण राहिलेली नाही.
ना पक्ष....ना झेंडा....
फक्त शेतकरी अजेंडा....
#आंनदाची_बातमी #पीकविमा #शेतकरी #khandesh #farmers #jalgaon #cropinsurance #Diwali2025
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: