पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा (2024-25) जिल्हाधिकारी मा. संजयसिह चव्हाण यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन :
Автор: Dr.Ratnakar kamble
Загружено: 2026-03-17
Просмотров: 41
Описание:
पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळा शैक्षणिक वर्ष (2024-25) परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा न्याय व दंडाधिकारी मा. संजयसिह चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन :
शारदा महाविद्यालय, परभणी येथे आज शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा न्याय व दंडाधिकारी मा. संजयसिह चव्हाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ. बबन पवार यांनी भूषवले. तसेच विचार मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, गुणवत्ता हमी कक्षाचे समनव्यक डॉ. संतोष नाकडे, परीक्षा विभागप्रमुख डॉ.सुनील बल्लाळ, डॉ.श्याम पाठक तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठाच्या विविध विषयाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष व सदस्य याची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्याम पाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.
सदरील कार्यक्रमानिमित्त परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा न्याय व दंडाधिकारी मा. संजयसिह चव्हाण यांचे संपूर्ण भाषण या व्हिडीओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. आवडल्यास चॅनेल Subscribe, Like व follow करायला विसरू नका. धन्यवाद🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: