ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

गोपाळचे शौर्य स्वाध्याय | प्रश्न उत्तरे | क्वेश्चन आंन्सर | इयत्ता सातवी सुलभभारती मराठी EnglishMedi

गोपाळचे शौर्य

गोपाळचे शौर्य स्वाध्याय

गोपाळचे शौर्य question answer

गोपाळचे शौर्य प्रश्न उत्तरे

गोपाळचे शौर्य प्रश्न उत्तर

गोपाळचे शौर्य क्वेश्चन आंन्सर

4 गोपाळचे शौर्य

४. गोपाळचे शौर्य

इयत्ता सातवी गोपाळचे शौर्य स्वाध्याय

इयत्ता सातवी सुलभभारती मराठी

इयत्ता सातवी सुलभभारती मराठी इंग्रजी माध्यम

gopalche shourya

std 7 sulabhbharati

Автор: Easy Learning Concepts

Загружено: 2024-09-01

Просмотров: 209

Описание: गोपाळचे शौर्य स्वाध्याय | प्रश्न उत्तरे | क्वेश्चन आंन्सर | इयत्ता सातवी सुलभभारती मराठी EnglishMedi


कथाकथनकार = कथा कथन करणारा/ करणारी, सांगणारा/ सांगणारी
कथासंग्रह = Anthology
बालसाहित्य = Children’s Literature
कादंबरी = Novel
ललितलेख = ललित शब्दाचा अर्थ ‘सौंदर्य’ ‘सुरेख’ ‘मनमोहक’ असा आहे.मनाला आनंद देणारे सौंदर्यतत्व या शब्दांमधून सूचित होते.लेखक हे लालित्य भाषेद्वारे निर्माण करीत असतो.आलंकारिक शब्दरचनेतून रसात्मक अनुभव वाचकांंना करून दिल्या जातो.लेखक प्रत्यक्षातल्या माणसावरून,अनुभवावरून कल्पनेच्या साहाय्याने पात्र निर्माण करतो.ती निर्मिती प्रतिभासिक निर्मिती असते. तात्पर्य. प्रत्यक्षातल्या जीवनाचे कल्पनापूर्ण निर्मितीत परिवर्तन घडविण्याची क्रिया म्हणजे साहित्यनिर्मिती होय.
वणवा = जंगलात लागलेली आग
शौर्य = शूरता, बहादुरी
गुण्यागोविंदाने = आनंदाने
पौराणिक = पुरातन, प्राचीन काळातील, फार जुन्या काळातील
ट्रेकिंग प्रेमी = गड चढण्याची आवड असणारे
बारमाही = बाराही महिने म्हणजे वर्षभर
झुळझुळत असते = वाहत असते
पाचू = हिरव्या रंगाचा हिरा (Diamond)
रानमेवा = जंगलामध्ये म्हणजे रानात कोणतीही लागवड न करता नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या व वाढणाऱ्या झाडांवर येणारी फळे म्हणजे रानमेवा.
रानमेव्यामध्ये आंबा, पेरू, फणस, जांभळे, आवळे, बोरे, चिंचा, करवंदे, अळू, अंबाडा, गोंदण, चारोळी इत्यादी फळे असतात.
भव्य = मोठा
कलागुण = नाच, गाणे, कथा, गोष्टी, नकला
घाट = एका बाजूला उंच डोंगर आणि एका बाजूला खोल दरी असलेला रस्ता
नाहक = बेमतलब
दरडावणे = रागाने बोलणे, फटकारणे
वाटेलगतच्या = वाटेला म्हणजे रस्त्याला लागून असलेल्या
परीघ = Circumference
इझणार नाईच = विझणार नाहीच
परेतनंच = प्रयत्नच
पोशिंदे = पोसणारे, खाऊ घालणारे (अन्न देणारे)
गुराखी = गुरे (ढोरे) राखणारा
पन्नाशीचे = पन्नासच्या जवळपास वय असणारे
न्याहाळणे = लक्षपूर्वक पाहणे
संभाषण = Conversation
चौफेर = चारही दिशांनी
वेडेपणा = Madness
हतबल होणे = निराश होणे, नाराज होणे
अग्निशामक दल = Fire Brigade
ऊर्जा = शक्ती, ताकद
बेस = चांगल, best
पत्ता भी लागला नस्ता = माहितही पडले नसते
समदं = सगळे
गहिवरून येणे = मन भरून येणे
निरपेक्ष = (फायद्याची) अपेक्षा न ठेवता
कौतुकास्पद = कौतुक करण्यायोग्य

स्वाध्याय
प्र. १. खालील प्रश्नांची एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) कर्णागड कुठे वसलेला आहे?
उत्तर :- नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात मोहदी हे खेडेगाव आहे. या गावापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर कर्णागड वसलेला आहे.
(आ) ‘गाडी थांबवा’, असे गोपाळ का ओरडला?
उत्तर:- जंगलात लागलेली आग आपण विझवली पाहिजे असे गोपाळला वाटले म्हणून “गाडी थांबवा” असे गोपाळ ओरडला.
(इ) गोपाळने आग विझवण्यासाठी काय केले?
उत्तर:- आज विझवण्यासाठी गोपाळने गाडीतून उडी मारली व धावत जाऊन वाटेलगतच्या शेतातील पाण्याने भरलेला रबरी पाईप सर्व शक्तीनिशी ओढायला सुरुवात केली.
(ई) आग वेळेवर विझली नसती तर कोणते नुकसान झाले असते?
उत्तर:- आग वेळेवर विझली नसती तर झाडाझुडपांबरोबर जंगलातील प्राणी, जनावरे व गुराखी सुद्धा मृत्युमुखी पडले असते.

प्र. २. कोण, कोणास म्हणाले ते सांगा.
(अ) “अरे वेड्या, ही जंगलाची आग आपण कशी काय विझवू शकू?”
उत्तर:- शिक्षक गोपाळला म्हणाले.
(आ) “माणसं असो का जनावरं त्यांना वाचवलंच पाहिजे ना!”
उत्तर:- गोपाळ गुराख्याला म्हणाला.
(इ) “पण साहेब, हे कसं शक्य आहे? मला तर हा वेडेपणाच वाटतो.”
उत्तर:- शिक्षक गाडीतील एका गृहस्थाला म्हणाले.
प्र. ३. गोपाळचा कोणता गुण तुम्हांला आवडला? का ते लिहा.
उत्तर:- गोपाळचा शूरता हा गुण मला खूप आवडला. कारण त्या दिवशी गोपाळणे दाखविलेल्या शौर्यामुळे आग तर विझलीच सोबतच अनेक प्राणी, पक्षी, जनावरे व गुराख्यांचे प्राणही वाचले.

चर्चा करा. सांगा.
• नैसर्गिक आपत्ती व मानवनिर्मित आपत्ती म्हणजे काय?
नैसर्गिक आपत्ती म्हणजे अशी नैसर्गिक संकटाची, आपत्तीची घटना जी नैसर्गिक रित्या व अचानक, अनपेक्षित पणे घडते. अशी घटना ही निसर्गामुळेच घडते. त्यात माणसाचा काहीच हस्तक्षेप नसतो.
अशा घटनांमुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी व मालमत्तेची सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी, नुकसान होते.
भूकंप, ज्वालामुखी, पूर, चक्रीवादळ, गारपीट, अतिवृष्टी, त्सुनामी, वणवा म्हणजे जंगलातील आग इत्यादी आपत्तीच्या घटना ह्या नैसर्गिक आपत्तीची उदाहरणे आहेत.
मानवनिर्मित आपत्ती
मानवी हस्तक्षेपामुळे किंवा माणसाच्या चुकीच्या क्रियाकलापांमुळे, माणसाच्या निष्काळाचीपणामुळे निर्माण होणारी आपत्ती किंवा संकट म्हणजे मानवनिर्मित आपत्ती होय.
गुन्हे, जाळपोळ, दहशतवाद, युद्ध, जैविक/रासायनिक धोका, सायबर हल्ले, रेल्वे अपघात, विमान अपघात, वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण अशा प्रकारच्या आपत्तीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तीय (मालमत्तेची) हानी होते.
• नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती कोणत्या, त्यांची यादी करा.
नैसर्गिक आपत्ती
भूकंप, ज्वालामुखी, पूर, चक्रीवादळ, गारपीट, अतिवृष्टी, त्सुनामी, वणवा म्हणजे जंगलातील आग इत्यादी
मानवनिर्मित आपत्ती
गुन्हे, जाळपोळ, दहशतवाद, युद्ध, जैविक/रासायनिक धोका, सायबर हल्ले, रेल्वे अपघात, विमान अपघात, वायू प्रदूषण, जलप्रदूषण, ध्वनी प्रदूषण इत्यादी.
• जंगलामध्ये वणवा लागू नये यासाठी कोणते उपाय करणे आवश्यक आहे, याबाबत मित्रांशी चर्चा करा.
जंगलात आग लागू नये यासाठी जंगलात फिरायला किंवा कोणत्याही कारणासाठी जाणाऱ्या लोकांनी ज्वलनशील पदार्थ सोबत घेऊन जाऊ नये. उदा. माचिस, घासलेट, पेट्रोल इत्यादी.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
गोपाळचे शौर्य स्वाध्याय | प्रश्न उत्तरे | क्वेश्चन आंन्सर | इयत्ता सातवी सुलभभारती मराठी EnglishMedi

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]