पोलिसाला दमदाटी, ८२ दिवसांनी Kailas Phad, Nikhil Phad सह Dhananjay Munde कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
Автор: Sattawari
Загружено: 2025-02-12
Просмотров: 3163
Описание:
#beed #kailasphad #nikhilphad #dhananjaymunde
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण आणि निर्घृण हत्याकांडानंतर, बीड जिल्ह्यातील मोडकळीस आलेली कायदा व सुव्यवस्था चव्हाट्यावर आली. बंदूकशाही, दादागिरी, मारहाण, राजकीय दबाव यासंबंधीची अनेक नवी जुनी प्रकरणे बाहेर यायला लागली... मंत्री धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेला परळीतील कैलास फड, याच्यावर यापूर्वीच परवानाधारक रिव्हॉलव्हर मधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी कारवाई झाली होती. बापाची बंदूक कमरेला लावून निडरपणे फिरणारा त्याचा मुलगा निखिल फड देखील चर्चेत आला होता... परळीत मुंडेंच्या कार्यकर्त्यांना अभय दिलं जातं, असं बोललं जात होतं. पण बीड जिल्ह्याचे नवीन SP म्हणून नवनीत कावत यांनी कार्यभार हाती घेतल्यानंतर ते चांगलेच ॲक्शन मोडवर आलेत... बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी त्यांनी कठोर पावलं उचलायला सुरुवात केलीये. विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणात, उशिरा का होईना पण फड पिता-पुत्रासह इतर चार ते पाच जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय... याप्रकरणी एका पोलीस बॉडीगार्डचा जबाब नोंदविण्यात आलायं. नेमकं हे प्रकरण काय होतं? तक्रार तर दाखल झालीये, पण मुंडेंच्या या खास कार्यकर्त्यांना आता अटक होणार का? त्याचीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: