पुरुष आणि स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे / Dr. Paurnima Patil from Indira IVF Centre Latur
Автор: Indira IVF
Загружено: 2023-03-18
Просмотров: 860
Описание:
फक्त महिलांना वंध्यत्वाच्या समस्या असतात का? पालकत्वातील जोडप्याच्या विलंबासाठी पुरुष देखील जबाबदार असू शकतात का? इंदिरा आयव्हीएफ सेंटर, लातूर, महाराष्ट्र येथील सिनियर कन्सल्टन्ट, डॉ. पौर्णिमा पाटील या व्हिडियोद्वारे वंध्यत्व काय आहे, त्याचे विभिन्न प्रकार आणि या समस्येमुळे किती पुरुष आणि स्त्रिया त्रस्त आहेत हे स्पष्ट करतील. आमचे प्रजनन तज्ञ डॉक्टर्स देखील पुरुष आणि स्त्रियांमधील अशा समस्येची कारणे आणि कोणत्याही उपचाराची योजना करण्यापूर्वी अचूक निदानाची गरज का असते हे स्पष्ट करतील. इंदिरा आयव्हीएफ येथे आम्ही रुग्णांना पालकत्वाच्या टप्प्यात प्रवेश करण्यासाठी सर्वसमावेशक चाचण्या करतो आणि त्यांना अत्यंत व्यक्तिगत स्वरूपाचे वंध्यत्वावर समाधान पुरवितो. तुमच्या जवळच्या इंदिरा आयव्हीएफमध्ये विनामुल्य सल्ला बुक करण्यासाठी, आजच कॉल करा: 18003094410
एखाद्या जोडप्याला वंध्यत्वाची समस्या आहे असे केव्हा म्हटले जाते?
डॉ. पौर्णिमा पाटील म्हणतात की लग्नाच्या अनेक वर्षांनंतर देखील (नियमित शरीरसंबंधांनंतर देखील) जर एखाद्या जोडप्याला मुल होत नसेल, तर त्यांना वंध्यत्वाच्या समस्या आहेत असे म्हटले जाते.
दोन प्रकारचे वंध्यत्व असतात- प्राथमिक वंध्यत्व आणि दुय्यम वंध्यत्व. एखाद्या जोडप्याला प्राथमिक वंध्यत्व आहे असे आपण तेव्हा म्हणतो, जेव्हा त्यांना एकदाही गर्भधारणा झालेली नसते. जेव्हा जोडप्याची आधी गर्भधारणा झालेली असेल, पण पुन्हा गर्भधारणा होऊ शकत नसेल, तर त्याला दुय्यम वंध्यत्व असे म्हणतात.
पुरुष आणि स्त्रियांमधील वंध्यत्वाच्या समस्यांची काय टक्केवारी आहे?
एखाद्या जोडप्याच्या गर्भधारणेतील विलंबात स्त्रियाच जबाबदार असतात या व्यापक गैरसमजाच्या विपरीत, संशोधन असे म्हणते की पुरुष आणि महिला वंध्यत्वाच्या समस्येसाठी समान जबाबदार असतात. 30% प्रकरणांमध्ये एखाद्या जोडप्यात स्त्रीमधील वंध्यत्वामुळे गर्भधारणा होत नाही, तर दुसऱ्या 30% प्रकरणांमध्ये पुरुषांमधील वंध्यत्व गर्भधारणेच्या विलंबासाठी कारणीभूत असते. 20% प्रकरणात, पुरुष आणि स्त्री या दोन्ही जोडीदारांमधील समस्येमुळे जोडप्याला मुल होऊ शकत नाही आणि वंध्यत्वाच्या उर्वरित 10% प्रकरणांची करणे अद्याप माहित नाहीत.
स्त्रियांमधील वंध्यत्वाची कारणे काय आहेत?
• गर्भ पिशवीतील समस्या
• गर्भाशयाच्या अंतःस्तराचा आकार अपुरा असणे/कमी असणे
• गर्भाशयातील फायब्रॉइड्स
• गर्भनलिकेमधील समस्या (अवरोध असणे किंवा अतिरिक्त पाणी असल्याने संसर्ग झाला असेल)
• अंडाशयांमधील समस्या
• वाढलेले वय
• स्त्रीबीजांची संख्या कमी असणे
• पीसीओडी
• हर्मोन्समधील असंतुलन
• इतर
पुरुषांमधील वंध्यत्वाची काय आहेत?
• शुक्राणूंची कमी संख्या
• शुक्राणूंची अपसामान्य रुपिकी
• शुक्राणूंची निकृष्ट चलनशीलता
वंध्यत्वावर उपचार सुरु करण्यापूर्वी योग्य निदानाची का गरज असते?
वंध्यत्वाचे मूळ कारण अचूकपणे ओळखण्यासाठी आणि अनुकूल अशी उपचाराची योजना करण्यासाठी योग्य निदानाची गरज असते. त्यामुळे, रुग्णांनी त्यांचा उपचार सुरु करण्यापूर्वी रुग्णांनी चाचण्या करून घेतल्या पाहिजे. इंदिरा आयव्हीएफ येथे, आमच्याकडे जागतिक दर्जेचे तंत्रज्ञान आणि वंध्यत्वाच्या चाचण्यांसाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. तुमच्या पालकत्वाचा प्रवास सुरु करण्यासाठी, तुमच्या जवळच्या इंदिरा आयव्ही एफ सेंटरला भेट द्या किंवा कॉल करा: 18003094410
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: