आयडीबीआय बँकेतील कामगारांसाठी मनसे आक्रमक, संदीप देशपांडेंचा अधिकाऱ्यांना इशारा | MNS vs IDBI Bank
Автор: Saam TV News
Загружено: 2025-11-21
Просмотров: 2859
Описание:
आयडीबीआय बँकेतील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ आणि कायमस्वरूपी नोकरीच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आंदोलनात सहभाग घेतला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी बँक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, 'आयडीबीआय बँकेचे अधिकारी हे अत्यंत माजूलेले अधिकारी आहेत. लातोंके भूत बाटोंचे नाही मांडते, अशा पद्धतीचे त्यांचा व्यवहार आहे.' गेल्या पाच वर्षांपासून अनेक मराठी संघटना बँकेत कार्यरत असूनही कामगारांना वेळेवर वेतन मिळत नसल्याने हे आंदोलन करण्यात आले. कामगारांना कायम करावे आणि पगारवाढ द्यावी या प्रमुख मागण्या आहेत. अधिकाऱ्यांनी निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली असली तरी, मनसेने चर्चेसाठी निश्चित तारीख देण्याची मागणी केली आहे.
#SandeepDeshpande #MNS #MaharashtraNavnirmanSena #IDBIBank #IDBIProtest #BankProtest #WorkersRights #LaborUnion #Mumbai #Maharashtra #MarathiNews #SaamTV #NewsUpdate #Protest #SalaryHike #IDBIBankNews
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: