Tomato | Tomato Farming India | Tomato Spray | टोमॅटो किड नियंत्रण आणि त्यावरील उपाय
Автор: Crop Care India
Загружено: 2020-04-05
Просмотров: 2452
Описание:
#India #Maharastra #Pune #Nashik #Kolhapur #Nagpur
#tomato #Indian_farming #Tomato_Farming #किड#नियंत्रण
#Tomatofarmingindia #Tomatospray
टोमॅटो हे महाराष्ट्रातील महत्वाचे पिक आहे. महाराष्ट्रात जवळ जवळ सर्वच ठिकाणी टोमॅटो चे उत्पादन घेता येऊ शकते. सद्यस्थितीत ३४००० हेक्टरवर टोमॅटोची लागवड होत आहे. महाराष्ट्राच्या एकुण उत्पादनाच्या ७५% उत्पादन नाशिक, पुणे, नागपुर, चंद्रपुर, अहमदनगर या जिल्ह्यामधुन मिळते. टोमॅटो ची लागवड नियंत्रित वातावरणात तसेच अनियंत्रित वातावरणातही केली जाते.
लागवडीचा हंगाम
तिनही हंगामात टोमॅटो ची लागवड फायदेशिर ठरते.
हंगामबी पेरण्याचा कालावधीखरीपजून, जूलैरब्बीसप्टेबर, ऑक्टोबरउन्हाळीडिसेंबर, जानेवारी
गादीवाफ्यावर रोपे बनविणे
पेरणीसाठी गादिवाफा बनविणे:
टोमॅटो लागवडीसाठी बियांची पेरणी गादी वाफयावर करावी.
गादी वाफा तयार करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून कुळवाच्या 2, 3 पाळया देऊन जमिन भुसभूशीत करावी.
गादी वाफा हा 1 मी. रूंद 3 मी लांब व 15 सेमी उंच असावा.
गादी वाफा तयार करताना २ घमेले शेणखत/गांडुळखत आणि ५० ग्रॅम सुफला मिसळावे.
गादिवाफ्यावर पेरणी:
हेक्टरी टोमॅटो पिकाचे 400 ते 500 ग्रॅम बी लागते.संकरित वाणांसाठी 125 ग्रॅम बियाणे हेक्टर क्षेत्रासाठी पुरेसे असते
बीजप्रक्रियेसाठी थायरम तीन ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा 0 ग्रॅम प्रति किलो आणि त्यानंतर ऍझोटोबॅक्टर 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कूज हे रोग नियंत्रणात राहतात
रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून घ्यावीत
ट्रे मध्ये रोपे बनविणे
एक ट्रे भरण्यासाठी कोकोपीट किंवा गांडुळखताचा वापर करावा
कोकोपीटने भरलेल्या ट्रेमध्ये एका कप्प्यात एक बी याप्रमाणे बी पेरावे
या पद्धतीमध्ये प्रत्येक उगवण झालेल्या रोपावर काटेकोर नजर ठेवता येते त्यामुळे या पद्धतीत बियाणे वाया जात नाही
रोपांची पुर्न:लागवड
बी पेरणीं पासून 25 ते 30 दिवसांनी म्हणजे साधारणतः रोपे 12 ते 15 सेमी उंचीची झाल्यावर किंवा रोपावर सामान्यपणे ५-६ पाने आली , की अशी रोपे शेतात लागवडीसाठी योग्य असतात
रोपांची सरी वरंब्यावर किंवा गादिवाफ्यावर पुर्नलागवड करावी
लागवडीच्या ४ दिवस आधी गादीवाफ्यावरील रोपांना पाणी देण्याचे बंद करावे
टोमॅटो पीक ज्या जमिनीत घ्यावयाचे आहे त्या जमिनीत अगोदरच्या हंगामात वांगी, मिरची ही पिके घेतलेली नसावीत, कारण त्यामुळे कीड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो
लागवड करताना दोन रोपांतील अंतर 30 सें.मी. ठेवावे
रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना पुन्हा पाणी द्यावे
वाफ्यांमध्ये पाणी असतानाच ओल्यातच रोपांची लागवड करावी
लागवडीपूर्वी रोपे दहा मि.लि. डायक्लोरव्हॉस अधिक दहा ग्रॅम कार्बेन्डाझीम प्रति दहा लिटर पाणी या द्रावणात बुडवून घ्यावीत
रोपे उपटण्यापूर्वी एक दिवस आधी वाफयांना पाणी द्यावे
रोपांची पुर्नलागवड नेहमी संध्याकाळी किंवा उन कमी झाल्यावर करावी
रोपे लावताना रोपांच्या खोडावर दाब देऊ नये
टोमँटोच्या अधिक उत्पादनासाठी २ रोपे एका ठिकाणी लावणे अधिक फायदेशीर असते

टोमॅटोच्या जाती
रोमा :
झाडे लहान असून फळे आकाराने लांबट व जाड साल असल्याने वाहतूकीस योग्य आहे.
अर्का गौरव :
फळे गडद लाल मांसल व टिकावू असतात.
पुसा १२० :
ही जात निमॅटोडला प्रतिकारक आहे. झुडूपासारखी वाढणारी असून फळे मध्यम गोल आणि आकर्षक लाल रंगाची असतात.
पुसा गौरव :
ही जात झुडूप वजा वाढणारी आहे. फळे लांबट गोल पिकल्यावर पिवळसर लाल रंगाची होतात. वाहतूकीस योग्य आहे.
पुसा रूबी :
तिन्ही हंगामात चांगले उत्पन्न देणारी ही जात असून लवकर येणारी आहे. फळे मध्यम चपट्या आकाराची गर्द लाल रंगाची असतात. तसेच विषाणूजन्य रोगांना कमी प्रमाणात बळी पडते.
पुसा शितल :
हिवाळी हंगामासाठी लागवडीस योग्य जात असून फळे चपटी गोल लाल रंगाची असतात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: