मी सांगोल्याचा माजलेला रेडा ,शिंगाटच घालीन संज्या : शहाजी बापू पाटलांच तुफान भाषण Shahaji Bapu Patil
Автор: VIRAL IN INDIA
Загружено: 2022-07-05
Просмотров: 131184
Описание:
शहाजी बापू पाटील यांचं असं सांगोला नगरीत असं भाषण । मी सांगोल्याचा माजलेला रेडा,शिंगाटच घालीन संजय राऊतची केली नक्कल
बंडखोरी केल्यानंतर अखेर १५ दिवसांनी शहाजीबापू पाटील हे आपल्या मतदारसंघात परतले. सांगोल्यात गेल्यानंतर त्यांनी जाहीर सभेतून संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, “संजय राऊत… मी सांगोल्याचा माजलेला रेडा आहे, एक शिंगाट खाली घातलं तर तुला असाच उभा करेन, आमच्या नादाला लागू नको.” यावेळी त्यांनी भरसभेत संजय राऊतांची नक्कल देखील केली आहे.
त्यांनी नक्कल करताना म्हटलं की, “संजय राऊतांचं मनगट हे अंगठ्याएवढं आहे, आणि ते कापून काढू, प्रे-- आणू अशा धमक्या देतात. तुझं तुलाच चालता येईना, सकाळी बशीभर पोहे खातो, सायंकाळी चपाती खाऊन झोपते. ये आमच्याकडे बोकड कसं वरपायचं, कोंबडी कशी तोडायची असते, शिकवतो. त्यानंतर अंगात रग येते. मनगटात ताकद येते. ज्यांच्या मनगटात ताकद असते, त्यांनीच बोलावं. उद्धव ठाकरेंमुळे संधी मिळाली आहे, म्हणून संजय राऊतांनी याचा गैरफायदा घेऊ नये. त्यांनी तातडीनं बोलणं बंद करावं, तरच उरलं-सुरलं ठाकरे घराणं राहीन, नाहीतर ठाकरे घराण्याला संपवण्याची सुपारी संजय राऊतांनी उचलली आहे,” असंही शहाजी बापू पाटील म्हणाले.
तत्पूर्वी, शहाजी बापू पाटलांनी सांगोल्यात दाखल झाल्यानंतर, माध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा ते म्हणाले, की राऊतांच्या नादी लागण्यात काय अर्थ आहे. सांगोल्यातील मैदानातून त्यांच्याबाबत बोलणार, त्याप्रमाणे शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यातील जाहीर सभेतून संजय राऊतांवर जोरदार टीका केली आहे.
काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओकेमंधी हाय, या वाक्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील महाराष्ट्रभर व्हायरल झाले. हा डायलॉग इतका व्हायरल झाला, की यावर गाणंही बनलं आहे. शहाजी पाटलांच्या या गुणाचं खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी देखील कौतुक केलं होतं. शिंदे आणि फडणवीसांची सत्ता स्थापन झाल्यानंतर आमदार शहाजी बापू पाटील पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात परतले आहेत. यावेळी आयोजित सत्कार समारंभात काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील.. एकदम ओके हाय म्हणतं शहाजी बापूंनी डायलॉगबाजी केली.
आमदार शहाजी पाटील पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसेनेला लागलेली वाळवी आम्ही काढून टाकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला बाहेर नेले नसून आम्हीच शिंदे साहेबांना बाहेर घेऊन गेलो होतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांच्यावर टीका करताना आमदार पाटील म्हणाले की, अजित पवार यांनी माझ्या झाडी, डोंगराचा उल्लेख केला याबद्दल धन्यवाद देतो. परंतु सांगोल्याला दिलेल्या निधीचा तुम्ही जाहीर उल्लेख करता तसाच अजितदादा तुम्ही तुमच्या मातेची शपथ घेऊन बारामतीला दिलेला निधीही जाहीर करा असा थेट सवालच त्यांनी पवार यांना केला. आजपर्यंत एवढा निधी देऊनही बारामतीचे कामच संपेना. यावर आता पीएचडीच करावी लागेल असेही ते म्हणाले.
या सभेसाठी यावेळी माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, सागर पाटील, दिग्विजय पाटील, प्रा. संजय देशमुख, शहाजीराव नलवडे, उदयबापू घोंगडे, गुंडा खटकाळे, विजय बाबर, संभाजी आलदर, समीर पाटील यांच्यासह आमदार शहाजी पाटील गटांचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. संजय देशमुख यांनी केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार- सावंत, डॉ. विजय बाबर, संभाजी आलदर आदिंनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी तालुक्यातील राजकारणावरून बोलताना आमदार शहाजी पाटील माजी आमदार दीपक साळुंखे - पाटील व शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उद्देशून म्हणाले की, एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माझे काम ओके आहे. यापुढे तुमचं तुम्ही बघा. येथे आठ ते दहा दिवसात अजूनही राजकीय उलताफलती होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 'काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल..! असे भाषणात पुन्हा बोलून त्यांनी मी माझी रांगडी, माणदेशी व बोलीभाषा बोललो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
shahaji bapu patil
shahaji bapu patil call
shahaji patil
shahajibapu patil speech
shahajibapu patil sangola speech
shahajibapu patil bhashan
शहाजीबापू पाटील
शहाजी पाटील call recording
शहाजीबापू पाटील भाषण
शहाजीबापू पाटील सांगोला
शहाजीबापू पाटील यांचे भाषण
kay zala kay dongar kay hotel
kay zadi kay dongar song
kay zadi kay dongar
Shahajibapu Patil Speech #Sangola #shahajibapupatil #uddhavthackeray #shivsena #ajitpawar #kayzadikaydongar #speech #trending #marathispeech #shahajipatil #sangola #pandharpur #Solapur #aamdar #shivsena #thane #eknathshindespeech #baramati #dattatraybharne #bjp #sena #cm #news
Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel.
Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
----------------------------------------------------------------------------------------------------------
☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
► YouTube : / viralinindia1
► Facebook : / viralinindiayoutube
► Write us : [email protected]
About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, e etc..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: