चारशे फुट उंचीवर गुहेत जाण्यासाठी जीवघेणा 😱 खडतर प्रवास | Rock climbing & Rapaling to cave
Автор: Mi Vatsaru मी वाटसरू
Загружено: 2024-01-06
Просмотров: 777
Описание:
अत्यंत कठीण श्रेणीत मोडणारा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील ढाक भैरीतील गुहा आणि याच किल्ल्याजवळ असलेला 'कळकराय' सुळका. भैरीला जाण म्हणजे साक्षात मृत्युला आमंत्रण देणच.
ढाक बहिरी हा रायगड जिल्ह्यातील सांडशी गावात स्तिथ बुलंद असा एक किल्ला आहे. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात. हा किल्ला रहिवासी ठाकूर आदिवासींच्या दैवत बहिरी देवांना समर्पित आहे म्हणूनच त्याला ढाक बहिरी असे म्हणतात. या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. बहिरी चा वापर आजूबाजूच्या ( राजमाची) किल्यावर पहारा देण्यासाठी केला जायचा. ढाक बहिरी किल्ला आणी या किल्ल्याच्या जवळच असणारा कळकराय हा सुळका इतिहास प्रेमी, गिर्यारोहक , साहस प्रेमी यांना आकर्षित करतो. कर्जत डोंगररांगेत येणारा हा ट्रेकर्सच्या दृष्टीने अत्यंत कठीण समजला जातो. ढाक भैरीला जाताना प्रत्येकाच्या शारीरिक क्षमतेचा जणू कस लागतो.
#Kalakrai_Pinnacle #Vajir_Sulka #Kondeshwar #zambivali #rock_climbing #rapaling #dangya_sulka #vanarlingi_sulka #highest_pinnacle
गुहेच्या समोरच राजमाचीचे #श्रीवर्धन आणि #मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच #नागफणीचे टोक , #प्रबळगड, #कर्नाळा, #माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे.
ढाक बहिरीला पोचण्यासाठी पुणे – कामशेत – जांभिवली या मार्गाने, जांभिवली गावापर्यंत जाता येते. तेथून पुढे अर्धा ते पाऊण तास चालल्यानंतर कोंडेश्वर मंदिर लागते. तेथून जंगलवाट सुरू होते. त्या वाटेने पुढे गेल्यानंतर एक चिंचोळी 90 अंशा मधे उभी असणारी खिंड लागते. ही खिंड ढाकचा किल्ला आणि सरळसोट उभा कळकरायचा सुळका यांच्या मधोमध आहे.
जाण्याचे मार्ग :
१. लोणावळा-तुंगार्ली-वळवंड-ढाक- (३०/३५ किमीची लांबलचक वाटचाल.)
२. तळेगाव्/कामशेत-जांभिवली-कोंडेश्वर- ढाक (-जांभिवली-कोंडेश्वर- ढाक ७/८ किमी पण जांभिवली एसटी अगदी कमी आहेत. स्वतःच्या वाहनाने यायचे झाल्यास रस्ता खराब आहे याची नोंद घेणे)
३. कर्जत-सांडशी-ढाक (दमछाक करणारी ४ तासांची १००० मीटर्सची तीव्र अशी घाट चढाई.)
अगदी अनुभवी सहकारी बरोबर असल्याशिवाय ढाकच्या वाटेला शक्यतो जाऊ नये. कळकराय सुळक्याच्या खिंडीपर्यंतचा रस्ता तुलनेने बराच सोपा आहे. जो काही थरार आहे तो शेवटच्या अर्ध्या पाऊण तासातच.उतरतांना अत्यंत काळजी आवश्यक.@Mivatsaru
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: