श्री सिंदुरात्मक गणेश मंदिर | Shendurwada | Aurangabad | Moraya । Web Series
Автор: Paulkhuna, The Footprints
Загружено: 2020-10-09
Просмотров: 3824
Описание:
Episode 17
श्री सिंदुरात्मक गणेश मंदिर | Shendurwada | Aurangabad | Moraya । Web Series
PAULKHUNA, THE FOOTPRINTS - MORAYA WEB SERIES
औरंगाबाद मधिल गांव शेंदुरवाडा
येथे भक्त स्मरे ठायी ठायी भक्तीचा पाढा
श्री शेंदुरात्मक बाप्पाचे हे भव्य तिर्थक्षेत्र
इथल्या भागिरथी कुंडाचे तिर्थ सदैवं पवित्र
आश्चर्यचकीत गोष्ट म्हणजे उंदिर मामाची येथे अनुपस्थिती
पण आहे येथे पुज्य संतांची समाधी
तर करुया आजची वारी
औरंगाबादच्या दारी...!!
गंगापूर तालुक्यातील शेंदूरवादा हे खाम नदीच्या काठावर वसलेले गाव. औरंगाबाद शहरापासून जेमतेम 35 किलोमीटरवर वसलेल्या या गावात खाम नदीच्या पात्रातच सिंदुरात्मक गणेशाचे मंदिर आहे. शके 1706 मध्ये इ.स. 1784 मध्ये बांधल्याचा शिलालेख तिथे पहायला मिळतो. अष्टकमानी मंदिराचे बांधकाम संपूर्ण दगडी आहे. कायगाव टोका येथील सुंदर मंदिरांना समकालीन असलेल्या या मंदिरात सिंदुरात्मक गणेशाची वाळूची भव्य दक्षिणमुखी मूर्ती आहे. नदीत उतरायला छोटासा दगडी घाट, जवळच भाविकांना राहण्यासाठी जुन्या काळात बांधलेली चिरेबंदी सराई आहे. श्री गणेशाच्या चरणी भागीरथी तीर्थकुंड आहे. त्याला "विनायक तीर्थ' असेही म्हणतात.
पुराणकथेत सांगितल्यानुसार एकदा झोपेतून उठलेल्या ब्रह्मदेवाने दिलेल्या जांभईतून महाकाय राक्षसाचा जन्म झाला. ब्रह्मदेवाने "तू ज्याला मिठी मारशील, तो भस्मसात होईल' असा वर त्याला दिला. त्याची प्रचिती पाहण्यासाठी तो ब्रह्मदेवालाच मिठी मारण्यासाठी झेपावला. त्याच्यापासून बचावासाठी ब्रह्मासह सर्वच भयभीत देवादिकांनी बाल गणेशाला साकडे घातले. गुरू पाराशर ऋषींच्या आश्रमात विद्या आत्मसात करणाऱ्या बाल गजाननाने त्या असुराला युद्धासाठी आव्हान दिले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध झाले. गजाननाने विश्वरूप धारण करून आपल्या पाशाने गळा आवळून त्या राक्षसाला ठार केले. त्याच्या रक्ताने गणेशाचे अंग शेंदरासारखे माखले. हे युद्ध जिथे झाले, ते ठिकाण म्हणजे शेंदूरवादा. येथील गणेशाला "सिंदुरवदन' किंवा "सिंदुरात्मक गणेश' असे म्हणतात.
लाइक करा,
शेयर करा,
सस्बस्क्राईब करा
व बेल आयकन दाबायला विसरू नका ! पहा नवीन ऐपिसोड दर शुक्रवारी सकाळी ११ वाजता. तुमची प्रतिक्रिया विडीयोच्या कमेंट्स सेक्शन मधून आम्हाला नक्की कळवा !
In this Episode
We take you to the Arena of Aurangabad
Situated on the banks of River Kham named Shendurvada
The Shenduratmak Bappa describes the Orange flourish of the Idol
And The Bhagirathi pond water is believed to Purely Nourish the People
Surprisingly The Conveyance of Ganpati Mouse is Absent here &
The Idol of Evil Shendrasur is replaced by Mouse as Conveyance care..!!
The Blessings of Bappa for Everyone are very much Holy and Precious So We Hope This YouTube channel reaches a Maximum number of People and They too Connect their Footprints with us..!!!
Google Map Location - https://www.google.co.in/search?q=Sin...[[19.9314719,75.3954713],[19.6704574,75.2017753]];tbs:lrf:!1m4!1u3!2m2!3m1!1e1!1m4!1u2!2m2!2m1!1e1!2m1!1e2!2m1!1e3!3sIAE,lf:1,lf_ui:2
Don't forget to like, share, subscribe and press the bell icon for Paulkhuna, to watch a new episode every Friday at 11 am. Let us know in the comments section below about how you liked it.
Concept by - Pramod Namjoshi, Dilip Sathe, Poonam Kamble
Narration - Shilpa Desai
Make up - Meenal Chiplunkar
Special thanks to - Umesh Halde, Pranav Raorane, Amruta Sakpal-Raorane
Description by - ANIKET BANKAR
#Moraya #Paulkhuna #Shenduwadha #Aurangabad #Shendurasur #LordGanesha #Webseries #MaharashtracheVishvavyapiDaivat #WIZWINGS #Shendurwada #shilpadesai #Sinduratmak #Ganpati Mandir #Travelbloggers #Youtubers #Influencers #Vloggers
FOLLOW US ON SOCIAL MEDIA:
FACEBOOK: / wizwings.paulkhuna
YOUTUBE: / @paulkhunathefootprints
INSTAGRAM: / wizwings.paulkhuna
TWITTER: / d_paulkhuna
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: