9th-10th Marathi: Applied Writing - Letter Writing - - 9वी-10वी मराठी: उपयोजित लेखन - पत्रलेखन
Автор: SAKAR
Загружено: 2020-11-12
Просмотров: 551
Описание:
पत्र लेखन
सौ. सुलभा प्रभुणे
साकार शिक्षण
प्रश्नाचे स्वरुप
प्रश्नपत्रिकेत प्र. ५ अ मध्ये दोन प्रकारची पत्रे विचारली जातात. त्यांपैकी एक लिहायचे.
किंवा पत्रलेखनाला पर्याय ’सारांशलेखन’
६ गुणांचा प्रश्न-- पैकी मायना - २गुण, मधला मजकूर - ३ गुण आणि खालचा मायना - १ गुण.
पत्रांचे प्रकार: दोन प्रकारची पत्रे.
अ) औपचारिक पत्र - मागणी, विनंती पत्र, ब) अनौपचारिक पत्र- घरगुती संबंधांची पत्रे
पत्राचे स्वरूप
ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचा ई-मेल आय.डी.
दिनांक
प्रति - ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे नाव व पत्ता.
पत्राचा विषय
योग्य मायना
मुख्य मजकूर
आपले नाव, पत्ता व ई-मेल आय.डी.
महत्वाच्या गोष्टी
ई-मेल आय.डी; दिनांक व पत्ता; इत्यादी सर्व गोष्टी डाव्या बाजूला लिहाव्या.
’माननीय’, असे लिहून मग ज्यांना पत्र पाठवायचे आहे त्यांचे नाव लिहावे.
प्रश्नात नाव, पत्ता दिला असल्यास तेच नाव लिहावे. नाहीतर आपल्या मनाने कोणतेही नाव लिहावे.
पत्राच्या शेवटी आपले नाव लिहावे. पण आपले खरे नाव लिहू नये. अ.ब.क. किंवा वेगळे नाव आणि पत्ता लिहावे.
अ) औपचारिक पत्र
परीक्षेमधे दोन प्रकारची औपचारिक पत्रे विचारतात. 1) मागणी पत्र 2) विनंती पत्र
मुख्य मजकूर
1. मागणी-पत्र
स्वतःची व शाळेची ओळख.
आपण मुख्याध्यापकांच्या परवानगीने लिहित आहोत ह्याने सुरुवात करावी.
आपल्या मागणीची नीट यादी लिहावी. चार ते पाच गोष्टींची यादी असावी.
पत्रात पैसे कसे पाठवणार ह्याचा उल्लेख हवाच.
त्यांच्या सहकार्याचा उल्लेख असावा.
2. विनंती-पत्र
स्वतःची व शाळेची ओळख.
कार्यक्रमाचा उद्देश, कार्यक्रमाचे स्वरूप, नियोजित रूपरेषा, स्थळ व वेळ
ज्यांना बोलवायचे त्यांची सोय कशी करणार मानधन इ. बाबत उल्लेख.
आपली विनंती नम्रपणे लिहावी. अतिशय आपुलकीने आमंत्रण करावे.
ब) अनौपचारिक पत्र
बाकी सर्व गोष्टी तशाच पण विषय लिहिण्याची गरज नाही.
भाषा साधी व अनौपचारिक असावी. आपल्या भावना योग्य शब्दात मांडाव्या.
मोठ्या व्यक्तींचा मान शब्दांतून राखावा. पत्रात जिव्हाळा दिसावा. इतर सर्वांची चौकशी करावी.
पत्रलेखनाचे महत्त्व व फायदे.
आपल्याला पुढील आयुष्यात अनेक वेळा पत्रलेखन करावे लागते.
पत्रलेखनामुळे आपले म्हणणे नेमक्या शब्दांत मांडता येते. आपल्या भावना चांगल्या शब्दांत मांडता येतात.
पत्रलेखनासाठी तंत्रज्ञानाचा वापर करता येतो.
चांगले पत्र हे तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: