Kantolichi Bhaji | Kartoli | Raan Bhaji | रानातून काढलेल्या ताज्या कंटोळीची सुकी भाजी | Kakora Sabzi
Автор: Gharcha Swaad
Загружено: 2018-08-07
Просмотров: 81004
Описание:
Kantolichi Bhaji | Kartoli | Raan Bhaji | रानातून काढलेल्या ताज्या कंटोळीची सुकी भाजी | Kakora Sabzi | Monsoon Special Veggie
साहित्य - ३५० ग्रॅम ताजी कंटोळी, ४ tblsp तेल, ½ tblsp राई, ½ tblsp जीरे, ½ teaspn हिंग, ७/८ कडीपत्त्याची पाने, ५ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, २ कांदे पात्तळ चिरलेले, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, १ tea spn हळद, ½ tblsp धणे पावडर, ½ tblsp घरगुती गरम मसाला, ५० ग्रॅम भिजवलेली चणाडाळ, ओल्या नारळाचा खीस अर्धी वाटी आणि चवीनुसार मीठ.
कृती - कंटोली चिरून आतील बिया काढून त्यांचे काप करून घ्या. २ तासभर चणाडाळ पाण्यात भिजवत ठेवा. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात राई, जीरे, कडीपत्ता आणि हिंग फोडणीला घाला. हलके परतून घ्या. आता यात मिरची, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर घालून कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. कांदा परतून झाल्यानंतर यात हळद, धणे पावडर आणि गरम मसाला घालून मसाले हलके परतून घ्या. आता यात काप केलेली कंटोली, भिजवलेली चणाडाळ आणि चवीनुसार मीठ घाला आणि मसाल्यात एकजीव करून घ्या. एकजीव करून झाल्यानंतर पॅनवर झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ काढा. गॅसची आच मध्यम ठेवा. ५ मिनिटानंतर यात ओल्या नारळाचा खीस घाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्या. पुन्हा वर झाकण ठेवून शेवटची ५ मिनिटे वाफ काढा. ५ मिनिटानंतर गॅस बंद करा आणि गरमागरम कंटोळीची भाजी चपाती किंव्हा भाकरी सोबत सर्व्ह करा. धन्यवाद !
Hello Friends Please Like, Share & Subscribe Our ' Gharcha Swaad '
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: