मला वाटते रिध्दपुरासी जावे, Mahanubhav Panth Slok, Singer- Vishal Jogdeo महानुभाव पंथ श्लोक
Автор: Vishal Jogdeo (Indian Playback Singer)
Загружено: 2020-01-03
Просмотров: 16473
Описание:
श्लोक- मला वाटते रिध्दपुरासी जावे
गायक, संगीत - विशाल जोगदेव
रचना- पारंपारिक
स्टूडियो- मधुरिका ऑडियो एड
रिकॉर्डिंग- चारुदत्त जिचकर
विडिओ- सम्राट गोटेकर
लेबल - विशाल जोगदेव प्रोडक्शन
#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#
--------------प्रार्थना-------
मला वाटते ऋध्दपुराशी जावे, प्रभू चरणी मस्तक हे ठेवावे
तृषा लागली स्वामीचे तीर्थ घ्यावे, लडीवाळे मी मागतो प्रेम द्यावे
महाद्वारी उभे प्रभू चरणचारी, क्रीडे राजमठी त्रिपुरूषी आवारी
विचारूचिरा उखळी गुढेयाशी, नमस्कार माझा जडा चेतनासी
चिरेबंदी वाडा प्रभू राऊळांचा, महाद्वारी थाट चहु साधनांचा
सखा नांदतो देव भक्तीजनांचा, नमस्कार साष्टांग या राघवाचा
#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#
मला वाटते ऋद्धिपुरासी जावे
प्रभु चरणी मस्तक हे ठेवावे ||
@ अर्थ-- मला असे वाटते, त्या ऋद्धपुराला जावुन श्री गोवुंदप्रभुंच्या चरणावर आपल मस्तक ठेवावे.
तृषा लागली स्वामींचे तीर्थ घ्यावे
लडीवाळ मी मागतो प्रेम द्यावे ||
@ अर्थ-- मला तहान लागल्यामुळे स्वामींचे चरणोदक घ्यावे असे वाटते. प्रेमपणाने मी मागणे मागतो मला आपले प्रेमदान द्यावे .
महाद्वारी उभे प्रभु चरणचारी
क्रीडे राजमठी त्रिपुरूषी आवारी ||
@ अर्थ-- महाद्वारामध्ये प्रभु बिन पादत्राणाचे उभे आहे राजमठामध्ये असलेल्या त्रिपुरूष मठाच्या आवारात श्रीप्रभुबाबा खेळ क्रीडा करत आहेत.
विचारूचिरा उखळी गुढेयाशी
नमस्कार माझा जडा चेतनासी ||
@ अर्थ-- ज्या चिर्यावर बसून श्रीप्रभूबाबा विचार करीत असे तो विचार चिरा, ज्या उखळीमध्ये तेल आणि रोटी खायचे ती उखळी प्रतिदिनी गुढ्यासी खेळ खेळायचे तो गुढा, या व्यतिरिक्त जे जड - चेतन आहे त्यांना माझा दंडवत !
चिरेबंदी वाडा प्रभु राऊळांचा
महाद्वारी थाट चहु साधनांचा ||
@ अर्थ-- श्रीप्रभुबाबांचा वाडा जो घडीव दगडांचा बांधलेला आहे , महाद्वार जे आहे ते चारी साधनाने शोभून दिसते आहे.
सखा नांदतो देव भक्तिजनाचा
नमस्कार साष्टांग या राघवाचा ||
@ अर्थ-- आमचा स्वामी त्या ऋद्धपुरामध्ये नांदतो म्हणजे राज्य करीत आहे. तुमच्या चरणी राघव नावाचा भक्तांचा साष्टांग दंडवत
#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#
महानुभाव पंथाच्या सुमधुर हिंदी मराठी भजनाच्या आस्वाद घेण्यासाठी खालील "दोन्ही यूट्यूब लिंकवर जाऊन Subscribe Button" वर क्लिक करा.
व निरंतर नवनविन चक्रधर बाबाच्या भजनांचा आनंद घ्या.
/ @mahanubhavpanthbhajansandhya
/ @vishaljogdeo
Please subscribe, like & share
#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#-#
श्री चक्रधर भक्तीधारा ( महानुभाव पंथिय भजनसंध्या)
भजन सम्राट श्री विशाल जोगदेव यांचा सुमधुर आवाज,उत्कृष्ट वाद्यवृंद आणि श्रीकृष्ण सुदामा तथा अनेक नयनरम्य सजीव झाक्या सोबत.
Contact for bhajansandhya program
7038086864, 8208958856
If you like the video please don't forget to share with others & also share your views
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: