Vivek Bhimanwar Resignation Demand | MPSC Students Pune Protest | एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार
Автор: Azad Marathi
Загружено: 2026-10-07
Просмотров: 540
Описание:
पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतेय. मात्र, विद्यार्थ्यांची मागणी आहे म्हणून राज्य सरकार किंवा मुख्यमंत्री थेट MPSC अध्यक्षांना पदावरून हटवू शकतात का? या प्रश्नाचं उत्तर समजून घेणं महत्त्वाचं आहे.
MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ही भारतीय संविधानाने स्थापन केलेली घटनात्मक संस्था आहे. त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती, राजीनामा आणि पदावरून हटवण्याची प्रक्रिया ही सामान्य सरकारी अधिकाऱ्यांपेक्षा वेगळी आहे.
या व्हिडीओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत की MPSC अध्यक्षांचा राजीनामा नेमका कसा होऊ शकतो? संविधानाच्या कलम 316 मध्ये काय तरतूद आहे? अध्यक्षांना राजीनामा कोणाकडे द्यावा लागतो? अध्यक्षांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया काय आहे? संविधानाच्या कलम 317 मध्ये काय सांगितलं आहे? राज्यपालांची भूमिका काय असते आणि राष्ट्रपतींची भूमिका कुठे येते? तसेच सर्वोच्च न्यायालयाची या संपूर्ण प्रक्रियेत काय भूमिका असते?
याशिवाय MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार नेमके कोण आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जात आहे, याचीही माहिती या व्हिडीओमध्ये समजून घेऊया.
MPSC अध्यक्षांना सरकार थेट हटवू शकतं का? की त्यासाठी संविधानात स्वतंत्र प्रक्रिया आहे? जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
#MPSC #MPSCProtest #MPSCStudents #MPSCChairman #VivekBhimanwar #MPSCExam #MPSCUpdate #MaharashtraPSC #PuneNews #MPSCAndolan #MPSCNews #MaharashtraNews #UPSC #ConstitutionOfIndia #Article316 #Article317 #SupremeCourt #Governor #PresidentOfIndia
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: