बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा! 359 अधिकारी, गणेश शहाणे प्रकरण | कारवाई शून्य!
Автор: VijayWadettiwar
Загружено: 2025-12-08
Просмотров: 643
Описание:
अहेरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून नोकरी मिळवली.
बोगस प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळवलेल्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी.
अहेरी नगरपरिषदेत मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे झाली आहे.याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश आल्यानंतरही कारवाई का होत नाही.
विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाबाबत प्रश्न उपस्थित करून राज्यात ३५९ कर्मचारी ,अधिकारी आहेत ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवली आहे. अहेरी येथील गणेश शहाणे यांच्याबाबत अवर सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाकडून कारवाई करण्याचे निर्देश आल्यावरही कारवाई का करण्यात आलेली नाही? असा कोणता राजकीय दबाव आहे की या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही असा सवाल सभागृहात उपस्थित केला.
गणेश शहाणे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी बळकावली यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे म्हणाले की याबाबतची यादी सबंधित विभागाला पाठवण्यात आली असून तीन महिन्यात कारवाई करण्यात येईल हे स्पष्ट केले.
#winterassembly #maharashtravidhansabha #wintervidhansabha #wintersession #news #adhiveshan2025 #aheri #gadchiroli #vijaywadettiwar #saheb #corruptionalert #politics
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: