Rajmata Ahilya Devi Holkar fort Maheshwar
Автор: Subhash Inamdar
Загружено: 2023-06-17
Просмотров: 40
Описание:
नर्मदा नदीच्या काठावर वसलेले हे शहर अतिशय सुंदर आणि भव्य घाट आणि माहेश्वरी साड्यांसाठी प्रसिद्ध आहे. घाटावर अतिशय कलात्मक मंदिरे आहेत, ज्यातून राज राजेश्वर मंदिर मुख्य आहे.
महेश्वर हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. पहाण्यासारखं इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथे येण्याचे आकर्षण बिंदू आहेत.
महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आहेत. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटावर फारशी लगबग दिसत नाही. नदीच्या एकाच बाजूला घाट असल्याने तिथे बसून पलीकडचे ग्रामीण जीवन अतिशय छानपैकी बघता येते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: