देशात सर्वात अगोदर सोलापूर झाले स्वतंत्र...
Автор: Yes News Marathi
Загружено: 2019-01-12
Просмотров: 11987
Описание:
स्वातंत्र्य लढ्यातील सोलापूरचे योगदान स्फूर्तिदायक, प्रेरणादायी आणि रोमांचकारी आहे. या शहरात १९३० साली मार्शल लॉ पुकारण्यात आला होता. ब्रिटिशांना आपल्या राजवटीत हिंदुस्थानात फक्त एकच शहरात मार्शल लॉ पुकारावा लागला, तो फक्त सोलापुरातच. एवढा प्रखर आणि निकराचा लढा या शहराने देऊन आपलं नाव स्वातंत्र्यलढ्यात अजरामर केले. १९३० सालातील ९, १०, ११ व १२ मे असे पारतंत्र्यातही चार दिवस स्वातंत्र्य उपभोगणारे शहर म्हणून आपला नावलौकिक साऱ्या जगात प्रस्थापित केला होता. धैर्य, शौर्य, त्याग आणि उत्कट देशभक्तीचे दर्शन घडविणाऱ्या सोलापुरातील चार क्रांतिकारकांना १२ जानेवारी १९३१ रोजी ब्रिटिशांनी फासावर चढविले. ८ मे १९३० रोजी शंकर शिवदारे हा २२ वर्षांचा तरुण सार्जंट हॉलच्या गोळीचा पहिला हुतात्मा ठरला. ऐका सोलापूरचा इतिहास कसा घडला तो प्रा.डॉ.श्रीकांत येळेगावकर यांच्या शब्दात फक्त येस न्युज मराठीवर..
★Follow us, Share, Support★
Website:- http://yesnewsmarathi.com/
Facebook:- / yesnewsmarathi
Twitter:- / yesnewsmarathi
★Contact us★
mobile- 9881748329
Email:- [email protected]
येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: