Jaykumar Gore | Ajit Pawar | न्यायालयाने झोडपलेल्या समाजकंटाकाचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
Автор: Lay Bhari News
Загружено: 2026-01-21
Просмотров: 1579
Описание:
#zpelection #MakrandPatil #ramrajenimbalkar #jaykumargore #shivendrarajebhosale #udayanrajebhosale
दाऊद इब्राहिम चा पाकिस्तानातून अजित पवारांना जर फोन आला तर अजितदादा दाऊद इब्राहिम ला आमदार बनवू शकतात, अगदी मंत्री ही बनवू शकतात. कारण राजकीय गणित जुळवण्यासाठी ते फायद्याचे ठरू शकते. अजित पवार यांच्यावर हा आरोप करण्याचे कारण असं की, अजित पवारांनी महात्मा गांधी, शिव, शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराला तिलांजली दिली आहे. अजित दादांच्या राष्ट्रवादीने सातारा जिल्ह्यामध्ये विराज शिंदे नावाच्या समाजकंटकाला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे. एवढेच नाही तर विराज शिंदे यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे तिकीट सुद्धा दिले आहे. या विराज शिंदेला सातारा सत्र न्यायालयाने झोडपलेले आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सोबत संधान साधून विराज शिंदे याने एक कोटी रुपयाचं खोटं खंडणी प्रकरण शिजवले होते. त्यात न्यायालयाने जयकुमार गोरे, विराज शिंदे व शाहिद इनामदार या तिघांना झोडपून काढले होते. या एक कोटी रुपयांचा घोळ अद्याप न्यायालयामध्ये मिटलेला नाही. हे एक कोटी रुपये परत मिळावेत म्हणून जयकुमार गोरे यांनी न्यायालयात अर्ज केलेला आहे. दुसऱ्या बाजूला विराज शिंदेच्या समाजद्रोही कृत्यामुळे त्याचे सासरे सुरेश जाधव यांना काँग्रेस पक्षाने सातारा जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती. विराज शिंदेलाही काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रदेश कार्यकारणीमध्ये महत्वाचे पद दिले गेले होते. पण या विराज शिंदेच्या भानगडींमुळे काँग्रेस पक्षाने दिलेले पद परत काढून घेतले होते. अशा या नमुन्याला अजितदादा व मकरंद पाटील यांना डोक्यावर घेऊन बसवले आहे. या विराज शिंदेची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जोपर्यंत हकालपट्टी होत नाही, तोपर्यंत अजितदादा, मकरंद पाटील व विराज शिंदे या तिघांनाही झोडपण्याची मोहीम 'लय भारी' प्रामाणिकपणे राबवणार आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: