अभ्यासासाठी श्री ज्ञानेश्वरीची सर्वोत्कृष्ट प्रत - कुंटे प्रत
Автор: SADGURUBODH
Загружено: 2025-09-13
Просмотров: 4631
Описание:
अभ्यासासाठी श्री ज्ञानेश्वरीची सर्वोत्कृष्ट प्रत - कुंटे प्रत
सद्गुरु भगवान श्री माउलींची वाङ्मयी श्रीमूर्ती असणारी भगवती श्री ज्ञानेश्वरी ही मराठी संतवाङ्मय अभ्यासकांच्या हृदयीची रत्नठेव आहे. त्या कारणानेच आजवरच्या सर्वच थोर साधुसंतांनी व संतवाङ्मयाच्या सगळ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ अभ्यासक आणि उपासकांनी श्री ज्ञानेश्वरीला अक्षरश: मस्तकी धारण करून अखंड मिरविलेले आहे; आणि ते यथार्थच आहे !
सद्गुरु भगवान श्री माउलींच्या हातची किंवा त्यांच्या समक्ष तयार झालेली श्री ज्ञानेश्वरीची प्रत आजतागायत उपलब्ध झालेली नाही. श्री माउलींच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वरीचे प्रत-शुद्धिकार्य संपन्न केलेल्या श्रीसंत एकनाथ महाराजांच्या हातची प्रतही दुर्दैवाने आजमितीस उपलब्ध नाही. नाथपूर्व व नाथोत्तर कालातील अनेक हस्तलिखिते उपलब्ध आहेत, पण त्यांच्यामध्ये अनेक पाठांतरे, अपपाठ, अशुद्धे व क्षेपके यांची रेलचेल आहे. त्यामुळे चांगल्या अभ्यासकांची नेहमी अडचणच होते.
१८९४ साली डॉ.श्री.अण्णासाहेब मोरेश्वर कुंटे यांनी महत्प्रयासाने व अत्यंत कष्टाने अनेक हस्तलिखिते तपासून सिद्ध केलेली श्री ज्ञानेश्वरीची प्रत प्रकाशित केली. त्यात त्यांनी सतराव्या शतकातील श्री.गोविंद बर्वे नावाच्या साधुपुरुषांनी तयार केलेली 'श्रीगीतेची पदपद्धती' देखील अंतर्भूत केलेली आहे. म्हणून या कुंटे प्रतीला 'बरवा परंपरे'ची प्रत म्हटले जाते. ही पदपद्धती गीता-ज्ञानेश्वरीच्या अभ्यासकांना अतिशय लाभदायक ठरणारी आहे.
श्रीज्ञानेश्वरीची कुंटे प्रत तिच्या अंगभूत गुणवैशिष्ट्यांमुळे अभ्यासक आणि उपासकांमध्ये त्या काळापासूनच एवढी मान्यता पावली की आजवर या प्रतीच्या असंख्य आवृत्या निघाल्या. वेगवेगळ्या प्रकाशकांकडून कुंटे प्रतीच्या जवळपास अठरा ते वीस आवृत्या प्रकाशित झालेल्या आहेत. मधल्या काळात अनुपलब्ध असलेल्या या प्रतीच्या श्रीवामनराज प्रकाशनाने देखील तीन आवृत्या प्रकाशित केल्या.
भगवती श्री ज्ञानेश्वरीचे उपासक, अभ्यासक आणि प्रेमी साधकजनांसाठी सर्वार्थाने अत्यंत मोलाची अशी ही 'कुंटे प्रत' श्रीवामनराज प्रकाशनाच्या वतीने चौदा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सर्वांगसुंदर अशा तीन स्वरूपांत पुन:प्रकाशित झाली आहे. सद्गुरु भगवान श्री माउलींच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती-वर्षाचे औचित्य साधून कुंटे प्रत आपल्या हाती आली आहे !
महत्त्वाच्या अर्थनिर्णायक तळटीपा व पाठांतरे यांचा अंतर्भाव असलेली ही कुंटे प्रत तीन प्रकारांमध्ये अर्थात् नेहमीच्या डेमी साईजमध्ये, त्याचबरोबर डबलडेमी (A4) साईजमध्ये आणि छोट्या पॉकेट आकारातली, प्रवासी सुटसुटीत पारायण प्रत या प्रकाशित झाली आहे. डबलडेमी साईजच्या प्रतीतील अक्षरे मोठी असल्याने ही प्रत पारायणासाठी तसेच अभ्यासासाठी अधिक सोयीची ठरेल, बिनाचश्म्याचेही वाचन करता येईल. अत्यंत देखणे सप्तरंगी मुखपृष्ठ, मोहरेदार मॅपलिथो जाड कागदावरील रेखीव व बिनचूक शुद्ध छपाई, टिकावू रेक्झिन बाईंडिंग यामुळे अतिशय सुबक व संग्राह्य ठरतील अशा ह्या तिन्ही विशेष प्रती, खरोखरीच दुर्मीळ असल्याने, नंतरची निराशा टाळण्यासाठी वेळ न दवडता लवकरात लवकर आपल्या ग्रंथसंग्रहात सामील कराव्यात ही प्रेमळ प्रार्थना.
श्री ज्ञानेश्वरी कुंटे प्रत -
डेमी साईज
पृष्ठसंख्या - ५८४, छापील मूल्य - ₹ ४०० /-
३०% सवलतीत मूल्य ₹ २८० /-
डबलडेमी साईज
पृष्ठसंख्या - ५७६, छापील मूल्य - ₹ ६०० /-
३०% सवलतीत मूल्य ₹ ४२० /-
पारायण प्रत
पृष्ठसंख्या - ९००, छापील मूल्य - ४००/-
३०% सवलतीत मूल्य ₹ २८० /-
कुंटे प्रतींसाठी कृपया 'श्रीवामनराज प्रकाशना'च्या कार्यालयाला भेट द्यावी अथवा भ्रमणभाष क्र.9322683824 यावर सकाळी 10.30 ते सायंकाळी 5.30 दरम्यान संपर्क करून आपली प्रत घ्यावी ही विनंती.
#ज्ञानेश्वरी #dnyaneshwari #jnaneshwari #shireeshdadakawade #शिरीषदादाकवडे #mauli #dnyaneshwarmauli #पारायण #dnyaneshwariparayan #माउली #माऊली
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: