पोलिसांनीच गुन्हा केला तर?? (
Автор: kayda vision /Adv.Madhav sir(Viregaonkar)
Загружено: 2024-12-21
Просмотров: 76
Описание:
नमस्कार मी ऍडव्होकेट माधव आजचा एपिसोड मध्ये आपले मनःपूर्वक स्वागत.लोकसत्ता पेपर मध्ये मी बातमी वाचली. मला नेहमी प्रश्न विचारला जातो की, पोलीस कर्मचारी हे कायद्याचे रक्षण करणारे असतात, आणि समाजामध्ये देशांमध्ये शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून देशात राहणाऱ्या लोकांचे सद्रक्षण करत राहतात मग पोलिसांनीच कायदा मोडला किंवा पोलिसांनी जर गुन्हा केला तर मग काय करायचे. एका प्रकरणांमध्ये पोलीस कोठडीत असताना आरोपीला पोलिसांनी मारहाण केली आणि त्यातून त् पोलीस कोठडीत असलेल्या आरोपीचा मृत्यू झाला होता. आणि संबंधित पोलीस अधिकारी यांना अटक केली होती. आरोपी पोलीस अधिकारी यांनी हायकोर्टात जामीन मिळण्यासाठी धाव घेतली होती. याच संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने, आपला न्याय निर्णय देताना अर्थातच जामीन चा अर्ज फेटाळताना आपले मत नोंदविले होते त्याचीच ही मी वाचलेली बातमी.
. कायद्याचे संरक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे. महाराष्ट्र पोलिसांची त्यांचे ब्रीदवाक्य ‘सद्रक्षणाय खलनिग्रहनाय’ याचा आदर राखणे आवश्यक आहे. पोलिसांनी गुन्हा केला तर त्यांच्याबाबत उदार भूमिका न ठेवता न्यायालयाने त्यांना अधिक कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने व्यक्त केले. कोठडीमृत्यू प्रकरणातील दोन पोलिसांचा जामीन रद्द करताना न्या.उर्मिला जोशी-फाळके यांच्या खंडपीठाने हे मत नोंदविले. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करत आरोपींना तात्काळ आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले.(@kaydavisionviregaonkar
#kayda
#motivation
पोलिसांनी गुन्हा केला तर
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: