कोरोनरी एन्जियोग्राफी म्हणजे काय ?
Автор: श्री संतोष बिभीषण रावकाळे
Загружено: 2025-11-09
Просмотров: 4
Описание:
#कोरोनरी_अॅन्जिओग्राफी_म्हणजे_काय?
ती का करतात? नेमकी कशी करतात?
#rusantusht #angiography
आजकाल हृदयविकाराला जोडूनच
येणारा शब्द म्हणजे अॅन्जिओग्राफी.
मुळात ती का करतात, नेमकी कशी
करतात आणि ती केल्यामुळे काय
उपयोग होतो हे आपल्याला माहीत
असणे आवश्यक आहे.कोरोनरी
अॅन्जिओग्राफी ही हृदयविकाराच्या
आजाराचे निदान करणारी सर्वोत्तम
तपासणी आहे. पुढील उपाययोजना
उपाययोजनेला हृदयाचा प्रतिसाद या
एका तपासणीने सहजपणे कळतो.
इतिहासाच्या पानांमध्ये डोकावता
असे दिसते, या कोरोनरी अॅन्जिओ
ग्राफीची सुरुवात खडतर प्रवासाने
झाली आहे.१९२९ साली ऐबर्सवाल्ड,
जर्मनी येथे वेरनर फोर्समन या २५
वर्षांच्या सर्जरीच्या डॉक्टरने युरिनरी
कॅथेटर स्वत:च्या हाताच्या नसेतून
हृदयाच्या उजव्या कप्प्यापर्यंत ठेवून
मग एक्सरे क्ष-किरण डिपार्टमेंटमध्ये
जाऊन स्वत:च्या हृदयाचा छातीचा
एक्सरे काढला.कार्डियाक कॅथेटराय
झेशनचा तो जिवंत माणसावर केलला
पहिला प्रयोग..!१९३० साली अशाच
कॅथेटरमधून हृदयाच्या कप्प्यांमध्ये रंग
द्रव्ये टाकून त्या कप्प्याचे चित्रीकरण
करण्याचा प्रयत्न झाला. पण १९३० ते
१९४० काळ खूप समस्यांचा गेला. नंतर
१९४० साली ए. कुर्नाड, एच. रेंजस व
डी. रिचर्डस् या त्रयीने वेगवेगळे कॅथेटर्स
निर्माण केलेत,जेणेकरून कोरोनरी
अॅन्जिओग्राफी सहजतेने केली जाईल
पुढे मॅसॉन सोन्स १९५८ व एम. जड
किंगस् १९६७) यांनी या कॅथेटरमध्ये
लक्षणीय सुधारणा करून व्यवस्थित
आकार असलेल्या,निश्चितपणे डाव्या
उजव्या हृदय रक्तवाहिन्यांत जाईल
अशा वेगवेगळ्या नळ्यांची उत्पत्ती केली
१९६७-१९६८ अॅम्प्लाटस् यांनी काही
विशिष्ट रुग्णांमध्ये ज्यांच्या हृदयाच्या
रक्तवाहिन्यांची जागा थोडीबहुत बदले
ली असते Abnormal Originविचित्र
रक्तवाहिन्यांचे चलचित्र काढण्यासाठी
वेगळ्या कॅथेटर्सची उत्पत्ती केली. त्यांना
अॅम्प्लाटस् कॅथेटर म्हणतात.२-५ टक्के
रुग्णांमध्ये या कॅथेटर्सचा वापर होतो
यांच्या या योगदानामुळे १९५६ साली
फोर्समन कुर्नाड व रिचर्डस् यांना वैद्य
कीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक
मिळाले.नोबेल पारितोषिक स्वीकार
ताना कुर्नाड यांनी म्हटले कोरोनरी
अॅन्जिओग्राफी एक चावीसारखी
तपासणी आहे, ज्याने हृदयाची सर्व
रहस्ये उघडता येतात कोरोनरी अॅन्जिओग्राफी
व कार्डियाक कॅथेटरायझेशन अशा
तपासण्या आहेत की, ज्यांनी हृदय
विकारचे निदान होते.. पुढची
उपाययोजना काय करायची याची
माहिती मिळते त्याच्या मार्फत उपाय
योजनेला हृदय कसे प्रतिसाद देत आहे
याचेसुद्धा अवलोकन केले जाते.
#श्री_संतोष_बिभीषण_रावकाळे
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: