आयोर्वेदिक वनस्पती लाजाळू जी अनेक बिमारी चा उपाय आहे.
Автор: SHYAM_IS_LÌVE
Загружено: 2024-01-07
Просмотров: 172
Описание:
वर्ग:#Magnoliopsida
कुळ:#Fabaceae
उपकुळ:Mimosoideae
जातकुळी:Mimosa
जीव:M. pudica
या छोट्या झुडपाचे खोड सरळ असते, परंतु झुडूप जास्त जुने झाले की ते वाकते. खोड सडपातळ असून त्यावर बारीक पुटकुळ्यासमान सच्छिद्र रचना असते. लाजाळूचे रोपटे जेमतेम गुडघ्याइतके किंवा फार तर दीड मीटर उंच वाढते. याची पाने संयुक्तपर्णी प्रकारातील असतात. या संयुक्त पानाच्या मधल्या दांड्याच्या (पर्णाक्षाच्या) दोन्ही बाजूस असलेली दले पुन्हा तशीच विभागलेली असतात. अशा पानांना bipinnately compound पाने म्हणतात. अशा सुमारे १० ते २० पर्णिकांच्या जोड्या मिळून एक पान बनते. पानाचे देठ (petioles) काटेरी असतात. फुलोऱ्याचा डेख-पुष्पबंधाक्ष (peduncle) फिकट गुलाबी किंवा जांभळट असून तो गुच्छ(flowerhead) पानाच्या बगलेतून (axil) फुटलेला असतो. फुलाचा खालचा भाग गोळीदार असून ८-१० मिलिमीटर व्यासाचा असतो. फुलाच्या पाकळ्या वरच्या भागी लाल असतात आणि त्यांचे तंतू जांभळट गुलाबी असतात. फुलांचे परागीभवन वाऱ्याने आणि कीटकांकडून होते. लाजाळूला हाताच्या बोटांप्रमाणे ७-८ शेंगा येतात. शेंगेत एकापुढे एक अशा २-४ बिया असतात. शेंगा काटेरी असतात.
लाजाळू तिच्या त्वरित हालचालीमुळे ओळखली जाते. संध्याकाळी झाडाची पाने आपोआप दुमडतात व संपूर्ण पान खाली ओघळते. सूर्योदयास ती पुन्हा उघडतात आणि उभी होतात. स्पर्श, गरम करणे, धमाका/स्फोट वा हालवण्याने या झाडाची पाने उत्तेजित होउन मिटतात. स्पर्श केलेल्या पानाच्या शेजारील पानासदेखील ही उत्तेजना झाडाद्वारे वितरित होते व तीदेखील मिटतात. ही हालचाल मुख्यतः पानातील टर्गर दाब कमी झाल्यामुळे होते असे आढळले आहे.टर्गर दाब हा कोषिकांच्या आतील द्रवामुळे व पाण्यामुळे कोषिकांच्या बाह्यावरणावर पडणारा जोर होय. तो जोर या झाडास सरळ उभे राहण्यास मदत करतो. परंतु तो दबाव जर उत्तेजनेमुळे बिघडला तर झाडांमधील रसायने आतील पाण्यास, ती कोषिका सोडण्यास बाध्य करतात. हा दबाव कमी झाल्यामुळे झाड गळल्यागत होते. Mimosaceae कुळांमधील झाडांमध्ये हा गुणधर्म असतो.
लाजाळूने ही पद्धत कां स्वीकारली हे कळलेले नाही. अनेक शास्त्रज्ञांच्या मते स्वसंरक्षणासाठी ते झाड असे करते. जनावरांनी या कृतीस घाबरून झाडापासून दूर रहावे अशी त्यामागची कल्पना असावी.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: