Share Markets Marathi मध्ये शिकवणाऱ्या जिगरबाज Youtuber Aajiची गोष्ट, @Market aani Me | BSE, NSE
Автор: Mumbai Tak
Загружено: 2020-12-04
Просмотров: 765122
Описание:
#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics कोणीही शेअर मार्केट शिकू शकतं असं अगदी रेटून म्हणणा-या या आजी आहेत ठाण्याच्या भाग्यश्री फाटक. शेअर मार्केटसारखा किचकट विषय अगदी सोप्या भाषेत मराठीत शिकवणा-या एकदम यंग युट्यूबर. आजी शेअर मार्केटची दुनिया कशी समजून घ्यावी, ट्रेडिंग कसं करावं, शेअर कसे विकत घ्यावेत, असं सगळं अगदी नीट शिकवतात. पण कुठला शेअर विकत घेऊ असं विचारणा-यांना मात्र त्या खडसावून सांगतात, मी अगदी माझ्या मुलालाही या प्रश्नाचं उत्तर देणार नाही.
भाग्यश्री फाटक या खरंतर मुळच्या मिरजेच्या लग्नानंतर ठाण्यात आल्या. गाण्यात, तबल्यात विशारद पूर्ण केलं, एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं. पण मुलं झाली आणि पुढे सगळंच थांबलं. म्हणून मग मुलं मोठी झाल्यावर म्हणजे 20 वर्षापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा स्वतःचं असं काहीतरी करायचं ठरवलं आणि शेअर मार्केटच्या अभ्यासाला सुरूवात झाली. नंतर शेअर मार्केटच्या अभ्यासाठी त्यांनी ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जायला सुरुवात केली, तिथे त्यांची एन्ट्री झाली खरी पण शेअर मार्केटचं काम म्हणजे काय वरण भाताचा कुकर लावणं नाही, यासारखे टोमणे ऐकावे लागले. पण आजी थांबल्या नाहीत. कसा होता या आजींचा प्रवास? त्याबद्दलचा हा खास रिपोर्ट..
#RPT0202
---------
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: