गर्भवती स्त्रियांनी ग्रहण का पाळावं धक्कादायक सत्य ...(डिस्क्रिप्शन पहा)
Автор: Anand Pimpalkar's Anandi Vastu
Загружено: 2026-03-01
Просмотров: 53536
Описание:
⭐ ३ मार्च २०२६चे चंद्रग्रहण, वेध–सूतक आणि गर्भवतींसाठी आवश्यक माहिती
३ मार्च २०२६, मंगळवार—धुलीवंदनाच्या दिवशी भारतात खग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक खगोलीय घटना असली, तरी भारतीय परंपरेत ग्रहणांना विशेष धार्मिक स्थान दिले गेले आहे. त्यामुळे विज्ञान आणि धर्म या दोन्हींच्या दृष्टिकोनातून या ग्रहणाकडे पाहणे महत्त्वाचे आहे.
धर्मशास्त्रानुसार चंद्रग्रहण
हिंदू धर्मात ग्रहणकाळाला उर्जेचे चढ-उतार मानले गेले आहेत.म्हणून ध्यान, जप, स्तोत्रपठण या गोष्टी ग्रहणकाळात अधिक फलदायी मानल्या जातात.
वेद-सूतक, स्नान, मंत्रपठण या पद्धती मानसिक शुद्धीकरणासाठी सांगितल्या गेल्या आहेत.
⭐ ३ मार्च २०२६ – भारतातील ग्रहणाची वेळा
घटना
भारतीय वेळस्पर्श (ग्रहणाची सुरुवात)दुपारी ३:२०मध्य (सर्वोच्च बिंदू)सायं ५:२४मोक्ष (ग्रहण समाप्त) सायं ६:४८
भारताच्या बऱ्याच भागात चंद्रोदय उशिरा होत असल्याने ग्रहण फक्त काही राज्यांत दिसेल —
जसे असाम, नागालँड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, तसेच ईशान्येकडील काही प्रांत.
पुणे-मुंबईसारख्या शहरांत चंद्रोदय ६:४१ वाजता असल्याने ६:४१ ते ६:४८ या काही मिनिटांत आंशिक दर्शन शक्य आहे (ढग नसल्यास).
⭐ वेध-सूतक काल (धर्मशास्त्रीय मतानुसार)
चंद्रग्रहणाचा सूतक (वेदकाळ) स्पर्शाच्या ९ तास आधी सुरू होतो.
परंतु सामान्य व विशेष व्यक्तींसाठी वेध वेगळा मानला जातो. सशक्त/निरोगी व्यक्तींसाठी
सकाळी सूर्योदयापासून (~६:२०) ते सायं ६:४८ पर्यंत सूतक.गर्भवती, वृद्ध, बालक, आजारी अशक्त व्यक्तींसाठी
यांच्यासाठी नियम सैल आहेत.सूतक सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:४८ एवढाच मानला जातो.
🟣 गर्भवती महिला — धर्मशास्त्र काय सुचवतं?
गर्भवती महिला भावनिकदृष्ट्या संवेदनशील असतात.
म्हणून परंपरेनुसार काही सूचनांचे पालन केल्याने मानसिक शांतता मिळते. जसे—अनावश्यक कामे टाळणे
तीक्ष्ण वस्तू वापरणे टाळणे,ध्यान-जप करणे,तणाव टाळणे
या गोष्टी वैज्ञानिकदृष्ट्या देखील मानसिक आरोग्यास उपयुक्त आहेत.
⭐ ३ मार्च २०२६ — गर्भवतींसाठी घ्यायची काळजी (सोपे आणि सुरक्षित नियम)
पाळायचा वेळ सकाळी ११:०० ते संध्याकाळी ६:४८
(हा केवळ पारंपरिक मान; आरोग्याच्या दृष्टीने सक्ती नाही.) काय करू शकता? (पूर्ण सुरक्षित)पाणी पिणे,डॉक्टरांनी दिलेली औषधे घेणे,भूक लागल्यास जेवण करणे
झोप घेणे,बाथरूमला जाणे,हलके-फुलके घरकाम
मोबाईलवरून ग्रहणाचे दर्शन
✔️ काय टाळल्यास चांगले? (परंपरेनुसार)
अनावश्यक बाहेर जाणे
जोरदार श्रमाची कामे
नकारात्मक भीती/तणाव
पोटावर दाब येईल अशी कामे
✔️ गर्भवतींसाठी योग्य जप / ध्यान
रामरक्षा
अथर्वशीर्ष
हनुमान चालीसा
आपल्या इष्ट देवतेचा मंत्र
किंवा फक्त श्वसन-ध्यान
हे सर्व मानसिक शांती आणि सकारात्मकता वाढवतात.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: