बळीराजाची लेकरं,कोठुरे.भाग-२/Baliraja Prat-2/Bull Video
Автор: Pratap Mogal Shree Photo's
Загружено: 2018-09-13
Просмотров: 25100042
Описание:
बळीराजाचीलेकरं..
"माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पाेशिंदा त्याच्या भाळी लिहीलेला रातदीस कामधंदा"
"शेतामधी माझी खाेप तीला बाेराटीची झाप.
तिथं राबताे कष्टताे माझा शेतकरी बाप"
एका कवीने केलेलं हे शेतकर्याचं मुर्तीमंत वर्णन.शेतकर्याच्या घराचे अंगण म्हटले की पहील्यांदा डाेळ्यासमाेर येते डाव्या किंवा उजव्या बाजुला दावणीला बांधलेली जनावरे.आेट्यावर बसुन येणार्या जाणार्यावर करडी नजर ठेऊन असलेला कुत्रा.त्यांच्या पाणी पिण्यासाठी केलेली साेय वगैरे वगैरे ..दावणीची जनावरे आणि शेतकरी यांचे अतुट नाते असते.ते पदाेपदी पहायला मिळते.ज्याच्या घरी गाय , म्हैस , बैल असतात त्या घराला सुट्टी म्हणजे काय हे माहीत नसते.राेजची वैरण काडी , शेणकूर करणे हा शेतकरी दादाच्या राेजच्या दिनक्रमाचाच भाग असताे.घरात लग्न असाे , किंवा अजुन कुठलाही कार्यक्रम असाे आधी जनावरांच्या चारा पाण्याची साेय केली जाते.बाहेरगावी जावेच लागले तर संध्याकाळपर्यंत परतावेच लागते.हे फक्त कर्तव्य म्हणून नाही तर एवढ्या माेठ्या प्रमाणात जिव्हाळ्याचा प्रेमाचा संबंध त्या जनावरांसाेबत झालेला असताे.पाेटाच्या वेदनेनी मलुल पडलेली गाय जेव्हा चारा खात नाही तेव्हा ह्या शेतकरी दादाच्या ताेंडीही घास उतरत नाही.सतत तिच्या उपचारांचीच काळजी त्याला सतावत असते.गाय जेव्हा वासराला जन्म देणार असते तेव्हा डॉक्टरांच्या साेबत शक्य ती मदत करायला हा शेतकरी दादा पुढे असताे.मग तीला बसायला जागा करुन दे , गरम पाण्यानी शेक दे , तीचा आवडता चारा तीला खायला दे ..काय काय नी काय काय...न बाेलता व्यक्त हाेत असलेले प्रेम आणी जीव्हाळा हा असा कृतीतून व्यक्त हाेत असताे.वासरु झाल्यानंतर ते काही मिनीटात उभे रहाते.तेव्हा त्याला गाईच्या पुढ्यात टाकतांना त्या गाईइतकांच आनंद ह्या शेतकरी दादाला झालेला असताे.आपल्या वासरला दुध पाजतांना फुटलेला पान्हा त्या गाईने घरातल्या तान्ह्यासाठीही थाेडा राखलेला असताे.तीच्या दुधाने माेठी झालेली लेकरे जेव्हा अंगणात बागडतात तेव्हा ती ही काैतुकाने त्यांचे खेळ पाहत असते.
शेतकरी दादा चा राेज चा दिनक्रम ठरलेला असला तरी कधी कधी बीकट प्रसंग येतात.राेज आपल्याला चारा घालणारी , पाणी पाजणारी , आपल्या आजुबाजुची जागा स्वच्छ करणारी व्यक्ती दिसत कशी नाही म्हणून ती मुकी दैवतेही कासावीस हाेतात.चारापाणी खात नाहीत.घरातल्या सगळ्यांनाच ते आेळखत असतात पण त्यांना त्यांची स्पेशल वक्ती हवी असते.हे असते प्रेम ह्या असतात भावना.आणि त्या शब्दावीना कशा व्यक्त कराव्यात हे ह्या मुक्या जनावरांकडून शिकावे.
दुर्दैवाने दावणीचा एखादा बैल ,गाय आजारपणाने दगावते😔त्या संपुर्ण घरावरंच ती एक शाेककळाचं असते.घरात दुखवटा पाळला जाताे.त्या मुक्या प्राण्याच्या आपल्या घरातील प्रवेशापासून ते त्याच्यामृत्यूपर्यंत जाेडलेल्या सर्व घटनांचा उलगडा हाेताे. हि गाय आम्ही जेव्हा घेतली तेव्हा आमच्याकडे काही नव्हतं.. आणी आज बघा .. ह्या गायीच्या रुपात लक्ष्मीच आली. अशी वाक्य घरातील प्राैढ व्यक्ती जेव्हा सांगते तेव्हा निर्व्याज प्रेम किती महान असु शकतं याची प्रचीती येते.मग गतप्राण झालेल्या त्या मुक्या जीवाला घराजवळील शेतात माेठा खड्डा करुन विधीवत पुजा करुन पुरले जाते त्यावर एखादे वृक्ष लावले जाते.ज्या गाईनी इतक्या वर्ष आपली साेबत केली ती कामधेनू ह्या धरणीच्या पाेटात शांत विसावलेली असते.आपल्या धन्याला तीच्या पाेटातून उगवणार्या वृक्षाची गाेड फळे चाखता यावी म्हणून.
#balirajacheleker
#बळीराजाची_लेकरं
#Baliraja
#pratapmogal
#황소
#बैलपोळा
#Bull
🙏🏻💐 🖋 पवन पाथरकर.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: