सुरण भाजी (कंदमुळे)/कोकणात भेटणारी/कोकणातीत निसर्ग सौंदर्य / Konkan Natural Beauty 🌹
Автор: Kokani PM vlogs
Загружено: 2025-07-07
Просмотров: 2840
Описание:
'सुरण कंदमुळे' -
या भाजी( कंदमुळे)विषयी माहिती मिळेल का? सुरणापासून कोणकोणते पदार्थ बनवू शकतो?
सुरण हा मुळात कंदमुळं या प्रकारा मध्ये मोडणारी वनस्पती आहे. आणि ती बहुतेक औषधी गुणधर्म असलेली देखील वनस्पती आहे.
सुरणाचा कंद काहीसा ओबडधोबड, अर्धगोल, एकंदरीत काहीसा चपटा गर्द तपकिरी रंगाचा असतो. आणि आतून किंचित म लालसर किंवा बदामी असतो. चिरताना हाताला खाज येते.
भाजी करण्यापूर्वी उकडताना चिंच कोकम घालावा नाहीतर आपल्या गळा ही खवखवू शकतो. म्हणून सुरणाचे तुकडे उकडताना आपण न विसरता आमसूल घालावी.
सुरण कुठेही अगदी सहज व कमी खर्चात मिळते. अरूची, अग्नीमांद्य, दमा, खोकला, पोटातील कृमींचा नायनाट होतो.
तसेच यकृताचे व प्लिहेचे, आतड्यांचे, संधिवाताचे विकारांवर
सुरणाची भाजी हितकारक असते. तसेच सुरणाचा वापर नियमित केल्यास मुळव्याध हा आजार कायमचा नष्ट होऊ शकतो.
सुरणाची भाजी बटाट्यासारखीच उकडून करतात. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपण बटाट्या ऐवजी सुरण उकडून घातले तरी ही ती भाजी छान लागते.😋
आम्ही कोलंबी मध्ये ही सुरण घालतो. मटन आणि चिकन मध्ये सुरण पण घालतो.😋😋 एकदम मस्त लागते.
तसेच तिखट, मीठ हलद गरम मसाला घालून तुपावर किंवा तेलावर फ्राय केल्यावर खुपच छान लागते.👌👌😋😋
एकंदरीत आपण सुरणाचा वापर प्रत्येक भाजीत बटाट्या ऐवजी करू शकतो. पण उकडताना चिंच कोकम नक्कीच टाका नाहीतर गळ्याची खवखव लवकर जात नाही.🙏🙂
सूरण ही भाजी कंदमूळ प्रकारात येते,मोठे कंद असते2 ते 5 किलो पर्यंत असते..घशात थोडे खाजु शकते.भाजी छान होते.कबाब देखील मस्तच होतात.चकत्या फ्राय पण छान होतात.रस्सा भाजी करता येईल,कटलेट करू शकता.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: