श्रीक्षेत्र गरुडेश्वर
Автор: Gurumauli गुरुमाऊली
Загружено: 2024-11-25
Просмотров: 999
Описание:
श्रीक्षेत्र गरुडेश्वर #garudeshwar#dattamandir
गरुडेश्वर हे भगवान दत्तात्रेयांच्या सर्व भक्तांसाठी पवित्र स्थान आहे. हे ते ठिकाण आहे जिथे परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी समाधी घेतली. समाधी मंदिर नर्मदा नदीच्या काठावर आहे. गरुडेश्वर हे टिळकवाड्याच्या दक्षिणेस व राजपिपळाच्या पूर्वेस वसलेले आहे.गरुडेश्वर हे भारताच्या गुजरात राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील नांदोड तालुक्यात एक गाव आहे. येथील प्रमुख आकर्षण म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे मंदिर आणि परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांचे पवित्र समाधी स्मारक आणि आश्रम.
गरुडेश्वर येथे येण्यासाठी जवळचे रेल्वे स्थानक हे एकता नगर रेल्वे स्थानक आहे. मुंबई हुन एकता नगर ला जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. एकता नगर येथून statue of unity येथे ही जाता येते.एकता नगर येथून साधारण 5km अंतरावर गरुडेश्वर येथील दत्त मंदिर आहे. एकता नगर येथून ऑटो रिक्षा तसेच प्रायव्हेट गाड्या उपलब्ध आहेत.साधारण 10 मिनिटात आपण मंदिराकडे पोहोचतो. मंदिर परिसरात हार फुले आणि पूजा साहित्याची लहान दुकानें आहेत. चला तर आपण मंदिरात प्रवेश करू. श्री दत्त मंदिरा मध्ये आपणास श्रीमत् वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराज यांच्याशी संवाद साधणारी दत्तमूर्ती पहावयास मिळते. ही भगवान दत्तात्रेयांची मूर्ती खरच खूप प्रभावशाली आहे .येथे गुरु दत्तात्रेय मंदिरात सकाळ-संध्याकाळ नियमित आरत्या होत असतात.मंदिराच्या सभामंडपातील शांत वातावरणात आपले मन प्रसन्न होते. दत्त मंदिराच्या उजव्या बाजूस नर्मदा नदीच्या तीरावर काही अंतर उतरल्यावर आपणास स्वामी महाराजांचे समाधी मंदिर पहावयास मिळते . समाधीच्या मागील बाजूस स्वामी महाराजांचे छायाचित्र आहे समाधीच्या पुढील बाजूस शूद्र-भक्त सेवकाला दिलेल्या पाषाणाच्या पादुका आहेतनर्मदा नदीच्या काठावर वासुदेवानंद सरस्वती स्वामींनी आपल्या स्वर्गीय प्रवासासाठी हे भौतिक जग सोडले ते हे पवित्र स्थान.मंदिराच्या बाजूस नर्मदा नदीवरील डॅमचे विहंगम दृश्य पहावयास मिळते.
या मंदिरा जवळच गरुडेश्वर महादेवाचे मंदिर आहे. ज्या वरून या परिसराला गरुडेश्वर हे नाव पडले.
येथे राहण्यासाठी भक्त निवासाची सोय आहे. तसेच नर्मदा परिक्रमा वासियांना राहण्याची उत्तम सोय आहे.प्रमुख दत्त स्थानात या गरुडेश्वर दत्त मंदिर स्थानाचा उल्लेख आहे. नर्मदा पुराणात या स्थानाचा स्पष्ट उल्लेख आहे. समष्टी कल्याणासाठी स्वामींचा दत्तअवतार असल्याने देवाने त्यांचा गृहस्थाश्रम अल्प समयात अव्यक्त केला. असे महान योगी सन १९१४ मध्ये गरुडेश्वर येथे चिरकाल निद्रेत विलीन झाले. दत्तसंप्रदायामधे स्वामींचे नाव आदरने घेतले जाते.
music credit
avinash satoskar
instagarm :https://instagram.com/sanjusalkar?igs...
#dattamaharaj #dattaguru #narmada#narmadaparikrama#shreevasudevanandsaraswati#tembeswami
#marathivlog #marathi #gurudevdatta#ektanagar#gujrat#dattamandir#dattatrey#gangapur
#vlogs #marathisongs #ramanandsagar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: