21 - येऊ कशी प्रिया once more
Автор: Kalapini Talegaon YouTube
Загружено: 2025-12-24
Просмотров: 44
Описание:
कलापिनी संगीत विभागाच्या “गाणी मनातली” ला भरभरून प्रतिसाद
तळेगाव दाभाडे दि. २२ डिसेंबर २०२५
कलापिनी संगीत विभागाच्या वतीने सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक जोडी अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा “गाणी मनातली” हा कार्यक्रम आयोजित केला होता.
दित्या पन्हाळे या लहानगीच्या सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम तुला वंदितो, हरिनाम मुखी रंगते, विठू माऊली या गीतांनी भक्ती रसाची उधळण केली. प्रीतीच्या चांद राती, काळ्या मातीत, येऊ कशी प्रिया आणि अश्विनी ये ना या गाण्यांनी वन्स मोर मिळवले. दिसते मजला, रजनीगंधा, डोळ्यावरून माझ्या, पाहिले ना मी तुला, रुपेरी वाळूत, परीकथेतील राजकुमारा या गाण्यांनी रसिकांना भरभरून आनंद दिला. हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर प्रेक्षकांनी ठेका धरला. अष्टविनायका या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाला कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे, कार्याध्यक्षा अंजली सहस्त्रबुद्धे, चेतन शहा, श्रीशैल गद्रे, अशोक बकरे, विश्वास देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. वैशाली आगाशे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
प्रणव केसकर, लीना परगी, मैथिली देशपांडे – शिंदे, अनिकेत जोशी, गोविंद राठोड, डॉ विनया केसकर, कीर्ती घाणेकर, देवयानी लेले, स्वरा शिंदे, अमृता झा, जान्हवी पटवर्धन, विनायक लिमये यांनी गीते सादर केली. विराज सवाई आणि लीना परगी यांनी सूत्रसंचालन केले. विनायक लिमये यांनी संगीत संयोजन केले. प्रवीण ढवळे (ऑक्टोपॅड), योगीराज राजहंस (तालवाद्य), मंगेश राजहंस (तबला) प्रदीप जोशी (हार्मोनियम), राजेश झिरपे (सिंथेसायझर) यांनी साथसांगत केली. सुमेर नंदेश्वर यांनी ध्वनी संयोजन केले. रामचंद्र रानडे, रश्मी पांढरे,विनायक भालेराव, श्रीपाद बुरसे, रूपाली पाटणकर, दिपाली जोशी किशोर कसाबी आदींनी सहकार्य केले.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: