आमच्या बिल्डिंगचा हळदीकुंकू समारंभ 2025, विद्यासागर सोसायटी | Vidyasagar Soc Haldikunku Program 2025
Автор: Classic Kalakari
Загружено: 2025-02-09
Просмотров: 260
Описание:
@ClassicKalakari
Instagram:
https://www.instagram.com/sonalee.gha...
मकरसंक्रांतीपासून ते अगदी रथसप्तमी पर्यंत घरोघरी हळदी कुंकुचे कार्यक्रम चालू असतात.
पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. स्त्रीला घराबाहेर पडायला बंधनं होती. पण या हळदीकुंकूच्या निमित्ताने बायका एकत्र जमून एकमेकींची सुखदुःख जाणून घ्यायच्या. हळूहळू समाज प्रगत होत गेला तसतशी स्त्रीही स्वतंत्र झाली. पण हळदीकुंकवाची प्रथा मात्र आजही सुरूच आहे.
मार्गशीर्ष महिन्यात नवीन म्हणजे ज्यांच्या लग्नाला पाच वर्षे पूर्ण व्हायची आहेत त्या स्त्रिया हळदी कुंकू चा कार्यक्रम आप आपल्या घरी आयोजित करून इतर सौभाग्यवती स्त्रींना आपल्या घरी बोलवतात . हे झालं मार्गशीर्ष महिन्या बद्दल पण कोणत्याही मराठी हिंदू परिवारात अगदी गप्पा मारण्यासाठी म्हणून जरी दोन स्त्रिया एखाद्याची घरी जमल्या तरी गप्पा झाल्यावर घरी जाताना एकमेकींना हळदी कुंकू लावतात हा केवळ समोरचीच्या नवऱ्याला उत्तम आयुष्य लाभून आपल्या मैत्रीण चा संसार सुखाचा होवो अशी शुभकामना त्या मागे असते. अगदी एखाद्या देवी ची पूजा करतानाही स्त्रिया तिला हळद कुंकू वाहून स्वतःच्या कपाळात लावतात.
दरवर्षी मकरसंक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा आरंभ होत असतो... मकरसंक्रांतीला ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. अशा पोषक काळामध्ये हळदीकुंकू करणे हे जिवनाच्या दृष्टीने जास्त लाभदायक असते. हळदीकुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात् आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील दुर्गादेवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणार्या जिवासाठी कार्य करते. हळदीकुंकू करणे, म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. हळदीकुंकवाच्या माध्यमातून जीव एकप्रकारे दुसर्या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जिवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भाव वाढण्यास साहाय्य होते.
◆ हळद-कुंकू लावणे, म्हणजे दुसर्या जिवातील श्री दुर्गादेवीची अप्रकट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तीभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. तसेच अत्तर लावले जाते त्यात अत्तरातून प्रक्षेपित होणार्या गंधकणांमुळे देवतेचे तत्त्व प्रसन्न होऊन जिवासाठी अल्प कालावधीत कार्य करते. गंधकणांकडे देवतेचे तत्त्व आकृष्ट झाल्याने ते जिवासाठी व्यापक रूपात, म्हणजेच आवश्यक त्या उपरूपांत कार्य करते. आणि गुलाबपाणी शिंपडणे हाही प्रकार आहे. गुलाबपाण्यातून प्रक्षेपित होणार्या आपतत्त्वाशी संबंधित सुगंधित लहरींमुळे जिवाच्या सभोवताली असलेल्या वायूमंडलातील देवतेच्या सूक्ष्मतर लहरी कार्यरत होण्यास साहाय्य झाल्याने आपोआपच वातावरणशुद्धी होते. वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे जिवाला कार्यरत देवतेच्या सगुण तत्त्वाचा लाभ अधिक मिळतो. आणखी महत्त्वाचे म्हणजे ओटी भरणे... म्हणजे श्री दुर्गादेवीच्या ब्रह्मांडात कार्यरत असणार्या इच्छाशक्तीला आवाहन करणे. श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती ही तिच्या ओटीपोटात संपुटित झालेली असल्याने ओटी भरणे, म्हणजे तिच्यातील संपुटित इच्छाशक्तीला आवाहन करून शरण जाणे होय. ओटी भरण्याच्या प्रक्रियेतून ब्रह्मांडातील श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती कार्यरत झाल्यामुळे श्रद्धेने ओटी भरणार्या जिवाच्या देहातून बाहेर पडणार्या इच्छालहरींचे घनीकरण होऊन जिवाची अपेक्षित इच्छा पूर्ण होते. देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतूनच देवतेची कृपा लवकर संपादन करता येते. इच्छाशक्तीतूनच जिवाला साधना करण्याची स्फूर्ती मिळते. त्यानंतर साधनेतील पुढच्या टप्प्यात जिवाला देवतेच्या कार्यरत क्रियाशक्तीतून साधना म्हणून प्रत्येक कर्म करण्याची शक्ती प्राप्त होते आणि त्यानंतर कार्यरत ज्ञानशक्तीतून जिवाला वैराग्य प्राप्त होते. ओटी भरणे, म्हणजेच श्री दुर्गादेवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे होय. परंपरेनुसार वाण देणे सुद्धा महत्त्वाचे कार्य आहे. वाण देतांना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे, म्हणजे दुसर्या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे, म्हणजे अंगावरील वसनाच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते, म्हणजेच दान सत्कारणी लागते.
धन्यवाद - Thank you
CLASSIC KALAKARI
सौ. सोनाली वैभव घाडीगावकर.
( Mrs. Sonali Vaibhav Ghadigaonkar. )
#हळदीकुंकू#haldikunku #hinduculture #marathiculture #ukhanemarathi #sonalivaibhavghadigaonkar #sonalighadigaonkar #ukhanemarathi #ukhane #haldikunkuukhane #haldikunkuvaan #funtime #हळदीकुंकू #shevare #shevre #shirgaon #kokandarshan #कोकणदर्शन #बांदकादेवी #बांदकादेवीवर्धापनदिन #सौसोनालीवैभवघाडीगावकर #सोनालीवैभवघाडीगावकर #सोनालीघाडीगावकर #सोनालीघाडीगांवकर #सोनालीघाडी #sonalivaibhavghadigaonkar #sonalighadigaonkar #mrssonalivaibhavghadigaonkar #sonalighadi #sonalighadigaonkar #classickalakari #क्लासिककलाकारी # #manoranjanachichimuktudhlan #mumbaifestival #mumbaitradition #mumbaiculture #mumbai #comment #like #subscribe #vlogs #vlogger #youtuber #vidyasagarsociety
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: