श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई मंदिर. | क्षेत्र टेरव | Official Song 2023
Автор: Shree Kulaswamini Bhawani Mandir ( Terav )
Загружено: 2023-09-05
Просмотров: 8378
Описание:
श्री कुलस्वामिनी भवानी वाघजाई मंदिर. | क्षेत्र टेरव
सह्याद्रीच्या कुशीत वसले, सुंदर 'टेरव' गाव, वसली तेथे भवानी आई, सर्व मुखी तिचे नाव...
भव्य गोपुरे, अभिनवतेचे मंदिर बावन खणी, आदीमायेची मंगल मूर्ती, सकल जनांची जननी...
'कुलस्वामिनी महाराष्ट्राची' माय भवानी देवी,
प्रताप आपल्या दैवत्वाची, सकलाना ती दावी..
संकटीसमयी धावून येई, आपुल्या भक्तांसाठी,
तारुन नेई दुःख संकटे ही माय जगजेठी...... ।।
कोल्हापूरची 'महालक्ष्मी' इथे करते वास,
मार्गशीर्ष मासी इथे, पूजा तिची खास..
वसे मंदिरी 'कालकाई' अक्षय तीचे स्थान,
माहेरवाशिण सुखी ठेवण्या, सदा करु तीचे ध्यान..
जगन्मातेची नऊ रुपे ती 'नवदुर्गाच्या' मूर्ती,
जागृत साऱ्या मंदिरात, दिगंत त्यांची किर्ती.
ग्रामदेवता 'वाघजाई' कुशल सकलांसाठी,
दक्ष माऊली अष्टोप्रहरी, ग्रामस्थांच्या सदैव पाठी..
भैरी केदाराच्या मूर्ती, देती खडा पहारा,
सदैव जागृत त्या भवानी मंदिराच्या आवारा
पाषाणी ध्यानस्थ बैसले, भोलानाथ ही येथे, सोबत त्यांच्या गणराय, सकल विघ्नहर्ते.. .II
देवदर्शने सारे मंगल, मंगल भक्ता होई, आदीमायेच्या दर्शनास, तो पुनः पुन्हा हो येई .... ।।
श्री क्षेत्र टेरव मंदिरातील देवतांची महती.
लेखक:- ऍडव्होकेट यशवंतराव कदम (टेरव.)
गायन:- श्री प्रशांत सातोसे, मुंबई.
व्हिडिओ:- श्री हर्षल धुरी, मुंबई. ( Pictureit studios Mumbai )
संकल्पना व संयोजन:- श्री अजित कदम, श्री सुधाकर कदम,(टेरव), सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई.
Like | Share | Subscribe
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: