कशी काढायची रांगोळी
Автор: @amazing sanju (संजूबाबाची पोतडी)
Загружено: 2023-04-16
Просмотров: 2110
Описание:
आनंदाच्या प्रसंगी किंवा सणासुदीला दाराबाहेर रांगोळी काढण्याची पद्धत आहे.
@BIGSANJU007 , • कशी काढायची रांगोळी #rangoli #रांगोळी #you... हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळी ही सणांना आवर्जून काढली जाते.वेगवेगळ्या डिझाईन्स काढून त्यात रंग भरले जातात. त्यामुळे घराची आणि दाराची शोभा वाढते. भारताच्या वेगवेगळ्या प्रातांत वेगवेगळ्या पद्धतीने रांगोळी काढली जाते. गावाकडे अंगण, तुळशी वृदांवन असल्यामुळे तुळशीशेजारी आणि अंगणात रांगोळी काढली जाते. पण शहरांमध्ये #रांगोळी काढण्याची फारशी पद्धत नाही. पण संस्कृतीचा मान राखत हल्ली अनेक जण उंबऱ्यावर का होईना एखादे स्वस्तिक किंवा लक्ष्मीची पावले काढतात.रांगोळीला ‘रंगवली’ असे म्हणतात. सौंदर्य आणि मंगलसिद्धीचे प्रतीक रांगोळी मानली जाते. रांगोळीच्या विशिष्ट दगडांचा बुक्की करुन त्यापासून वेगवेगळे आकार तयार केले जातात. रांगोळी हे शक्ती आणि उदारतेचे प्रतीक आहे. रांगोळी काढण्यामागे शक्ती, उदारपणा आणि नशीब फळफळवणे हा हेतू असतो. शिवाय मांगल्याचे लक्षण म्हणून रांगोळी काढली जाते. अशुभनिवारक अशी ही रांगोळी असल्यामुळे सगळ्या नकारात्मक उर्जांना दूर करुन सकारात्मक उर्जा आणते. ज्यामुळे घरात आनंदी आनंद राहतो असे मानतात. हिंदू धर्मातच नाही तर पारशी धर्मातही रांगोळी ही याच कारणांसाठी काढली जाते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: