राजापूर गंगेला आलो ग्रामदैवतेची पालखी घेऊन। राजापूर गंगा। कोकणातील शिमगा।
Автор: Kokani Vibes
Загружено: 2024-04-05
Просмотров: 2489
Описание:
#rajapurganga #rajapur #shimga
राजापूर गंगेला आलो ग्रामदैवतेची पालखी घेऊन। राजापूर गंगा। कोकणातील शिमगा।
राजापूरची गंगा ही तर ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. साधारण तीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा म्हणतात.
उन्हाळे- गरम पाण्याचे झरे. सदा सर्वदा अतिशय गरम असलेले हे पाण्याचे झरे इथे आहेत. या पाण्यात आंघोळ केल्याने बारीक-सारीक त्वचा रोग बरे होतात. त्यामुळे सदैव इथे गर्दी असते.
मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या दक्षिणेला राजापूर नावाचं रम्य गाववजा शहर आहे. राजापूरवरून गोव्याकडे जाताना अर्जुना नदीवरचा पूल आणि नंतरचा छोटा घाट ओलांडल्यावर शहरापासून तीन-साडेतीन किलोमीटरवर उन्हाळे नावाचं गाव लागतं. तिथे दर तीन वर्षांनी गंगा प्रकटते. गंगावतरण झाल्यावर महाराष्ट्र तसंच गोव्यातीलही दूरदूरच्या ठिकाणांवरून भाविक तिथं येतात. तिच्या अकस्मात येण्याजाण्याच्या निसर्गाच्या चमत्काराचे सर्वांनाच अप्रूप!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: