खोमेश कांबळे, गोरेगाव अ ढि स वि स भंडारा आरक्षण संवाद मु धापेवाडा,तह तिरोडा जि गोदिंया 7 2 2026 13 5
Автор: AKHIL DHIWAR SAMAJ VIKAS SAMITI BHANDARA
Загружено: 2026-02-08
Просмотров: 93
Описание:
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मंत्र शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा या प्रमाणे ढिवर समाजाने आपल्या संविधानिक अुनसूचित जातीच्या आरक्षणासाठी अखिल ढिवर समाज विकास समितीची आरक्षण संवाद महासभा #मु._धापेवाडा, #तह._तिरोडा #जिल्हा_गोदिंया (@DHAPEWADA_TIRODA_GONDIA) (#reservation #DHIMAR #motivation) येथे सभा घेण्यात आली. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील ढिवर समाजाच्या अनुसूचित जातीच्या आरक्षणावर चर्चा करण्यात आली. तसेच प्रक्रियेची अद्ययावत माहिती देण्यात आली.
त्यासोबतच समाजाच्या संवैधानिक अधिकारांबाबत चर्चा करण्यात आली.
ढिवर समाज सन 1936 ते 1950 पर्यंत अनुसूचित जातीत सामाविष्ठ असतांना आज तो स्वत:च्या संविधानिक आरक्षणापासुन वंचित आहे. ढिवर समाज अनुसूचित जातीच्या यादीमध्ये कायम असता तर आज या समाजाची प्रगती होवू शकली असती परंतु या समाजाचे हे दुर्दैव आहे. म्हणून या समाजाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांची गरज असुन त्यांना अपेक्षित असे संघटन आपल्याही समाजात व्हावे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
आरक्षण म्हणजे काय? आरक्षणाची गरज कशासाठी? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले व समाजाला संघटित होण्याचे आव्हान केले. भविष्यात महाआंदोलनाची दिशाही ठरवावी लागेल असेही संकेत त्यांनी यावेळी दिले. अखिल ढिवर समाज विकास समिती यांनी आजपर्यंतचा राज्य व केंद्र सरकार सोबत केलेल्या पत्रव्यवहारासंबंधी माहिती दिली.
आपला
गोविंद कमल केवल मखरे, भंडारा
सचिव - अखिल ढिवर समाज विकास समिती भंडारा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: