एकनाथ शिंदेंनी भाजपला खिंडीत गाठले ? हार्ड बार्गेनिंगसाठी ‘Operation Tiger’ सुरू ?
Автор: Rahul Kulkarni Official
Загружено: 2026-01-18
Просмотров: 49053
Описание:
मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात भाजप-सेनेत महापौरपदासाठी खेचाखेची. एकनाथ शिंदेंकडून 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा. भाजपचा महापौर शिंदेंनाच नको : संजय राऊत
महापालिकेच्या निकालानंतर मुंबईसह कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिकेत मित्रपक्ष भाजप-शिवसेना युतीमध्येच जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मुंबईत भाजपपेक्षा कमी जागा जिंकल्या असल्या तरी आपल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणे अशक्य असल्याने शिंदेंच्या शिवसेनेकडून अडीच वर्षांसाठी महापौरपदाची मागणी करण्यात आली आहे. दगाफटका नको म्हणून शिंदेंनी आपले नगरसेवक ताज लैंडस् या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले आहेत. तसेच उद्धव आणि राज ठाकरे यांचे नगरसेवक गळाला लावून आपली ताकद वाढविण्याचे प्रयत्नदेखील एकनाथ शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर'च्या माध्यमातून सुरू केल्याची चर्चा आहे. दरम्यान, महापौर निवडीसाठी आरक्षण सोडतीनंतरच वेग येण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत बहुमतासाठी ११४ जागांची आवश्यकता असताना भाजपला ८९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपला २५ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला २९ जागा मिळाल्या आहेत. आपल्याशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणे अवघड असल्याने एकनाथ शिंदेंनी भाजपला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांनी मुंबईतील सर्व नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये हलविले
आहेत. त्यावेळी शिंदेंनी 'ऑपरेशन टायगर' हाती घेतल्याची चर्चा आहे. शिवसेना आणि मनसेचे नगरसेवक गळाला लावून मुंबई महापालिकेत आपली ताकद वाढविण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. त्यांचे नगरसेवक वाढले तर त्यांचा अडीच वर्षांसाठी महापौर पदाची मागणीला अधिक बळ मिळणार आहे. पान ६ वर
ताज लँडस्मधील नगरसेवक संपर्कात : संजय राऊत
उबाठा शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी 'सर्वांनी ठरविले तर मुंबईत भाजपचा महापौर होणार नाही', असा दावा करतानाच ताज लँडस्मध्ये ठेवलेले एकनाथ शिंदेंचे नगरसेवक एकेकाळचे आमचे सहकारी असल्याने ते संपर्कात असल्याचा दावा केला. एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याने राऊत यांनी त्यांच्यावर टीकाही केली. ज्यांनी स्वतः शिवसेनेचे आमदार फोडले त्यांना आता नगरसेवक फुटतील अशी भीती वाटत असेल तर आश्चर्याची गोष्ट आहे. जिथे मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, तरीही त्यांना आपले नगरसेवक फोडले जातील, पळवले जातील, अशी भीती वाटत असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणातली ही हास्यजत्रा आहे, असे राऊत म्हणाले, नगरसेवकांना किती काळ कोंडून ठेवणार? जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे आहेत. त्यांच्या मनातही मराठी अस्मितेची ज्योत किंवा मशाल धगधगते आहे. भाजपचा महापौर होऊ द्यायचा नाही हे जवळ जवळ सगळ्यांनी ठरवले आहे, असेही राऊत म्हणाले. कुणी कितीही कोंडून ठेवले तरीही इतकी साधने असतात संपर्काची, दळणवळणाची. त्यानुसार संदेश येत असतात. मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचा किंवा शिवसेनेचा व्हावा यापेक्षा भाजपचा होऊ नये अशी एकनाथ शिंदेंसह सर्वांची इच्छा आहे, असा दावा राऊत यांनी केला.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: