वडिलोपार्जित संपत्ती कायदा आणि हक्क
Автор: kayda vision /Adv.Madhav sir(Viregaonkar)
Загружено: 2024-12-16
Просмотров: 363
Описание:
मित्रांनो आजकाल कुटुंबात जागेबाबत जमिनीबाबत घरगुती वाद भांडण तंटे झालेले आपण नेहमी पाहत असतो. त्यापैकी काही वाद हे वडीलोपार्जित जमिनीच्या संदर्भात असतात तर काही वाद हे स्व:कस्तार्जित मिळकतीच्या वादाचे असतात. हे वाद आपापसात असतात हे वाद आई-वडिलांच्या हयात होतात किंवा आई-वडिलांच्या मृत्यूनंतर होतात. आता हे वाद कोणाकोणामध्ये होतात तर भावा-भावामध्ये होतात किंवाभावा-बहिणीमध्ये होतात.किंवा बहिणी-बहिणीमध्ये वाद होतात तर हे वाद वळीलोपार्जित संपत्ती बाबत/मालमत्तेबाबत होतात तर नेमकी वाद का होतात? हे वाद होण्यामागची कारणे काय असतील? तर वडिलोपार्जित जमिनीच्या अस्तित्वात असलेल्या कायद्याबाबत अपुरी माहिती किंवा कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे हे वाद होतात.. आणि कायद्याची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे न्यायालयात अनेकांची मालमत्तेच्या वादाची प्रकरणे प्रलंबित आहेत.. ज्यांनी-ज्यांनी अशी मालमत्तेच्या वादाची प्रकरण माननीय न्यायालय दाखल केलेले आहेत. त्यांना योग्य वेळी योग्य मालमत्तेच्या कायद्याची माहिती मिळालेली नाही आणि त्यामुळे अशी मालमत्तेच्या वादाची प्रकरणे न्यायासाठी वर्षा-नुवर्ष चालत आलेले आहेत.आणि तारखावर-तारखा मारून कोर्टात खेट्या माराव्या लागत आहेत
अशा परिस्थितीमध्ये जागेचे जमिनीचे वाद निर्माण होऊ नये.आणि जर असे मालमत्तेचे वाद निर्माण झाले तर त्यासाठी ह्या कायद्याची डिटेल मध्ये माहिती प्रत्येकाला असणे गरजेचे आहे. तरच मालमत्तेच्या विषयाचे उद्भवलेले वाद संपुष्टात येऊ शकतात.
नमस्कार मी ऍडव्होकेट माधव कायदा व्हिजन मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत.आज आपण वडिलोपार्जित संपत्तीचा कायदा जाणून घेणार आहोत भारत देशामध्ये वडिलोपार्जित संपत्ती बाबतचे कोणते कायदे आहेत.वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे नेमके काय? वडिलोपार्जित जमिनीच्या मालमत्तेवर महिलेचा हक्क किती? वडिलोपार्जित संपत्तीवर जावयाचा हक्क किती? वडिलोपार्जित संपत्तीवर पहिली पत्नी व दुसरी पत्नीचा हक्क किती?तसंच नवीन एक आलेला प्रकार म्हणजे लिव्ह इन रिलेशन आणि या लिविंग रिलेशनशिप मधून जन्मास आलेल्या आपत्याचा वडिलोपार्जित संपत्तीवर किती हक्क असतो ?ह्याबाबत संपूर्ण सोप्या भाषेत कायदेशीर माहिती पाहणार आहोत. माहिती ही महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहावा लागेल@kaydavisionviregaonkar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: