||Rampur bhajan spardha||bhajan mandal katol nagpur||bhajan spardha 2026
Автор: V.M VIDHARBHA BHAJAN
Загружено: 2026-01-19
Просмотров: 8985
Описание:
या रे या , गरिबांनो! या ,
या रे ! यारे गरिबांनो या, काम हाती घ्या,
करु खेड्याची सुधारणा काहि हो ! ।।धृ०।।
झालं गावाचं रान, सारी सुटली ही घाण,
इथं नाही जरा झाडय़ूड काहि हो ।
पाह मुल जवान, काय करतात काम ?
यांना जेवायची, झोपायची घाई हो ! ।।१।।
पाहायला साजरा, अंगात सदरा,
याचा मार्गात भरला पाय हो !
तसाच झटकुन, निघाला पटकुन,
घरात जावुनि खाई हो ! ।।२।।
आला नशिबी भोग, गावी शिरला हा रोग,
झाली लोकांना मरायची घाई हो !
देती कपाळी हात, घरोघरी रडतात,
मग वेळेवर सुचायचं नाही हो ! ।।३।।
झाले विहिरीत जीव, नाही कोणाला किव,
पाणि तसच पोहऱ्यात येई हो !
आली कॉलय्राची साथ,याने घातलासे घात ,
मग वेळेवर सुचायचं नाहि हो ! ।।४।।
व्हारे व्हारे हुशार, करा काहि कारभार,
गाव उजाड करायचं नाहि हो !
ऐका तुकड्याचि हाक, ठेवा देवाचा धाक ,
बघा झोपायचि वेळ आता नाहि हो ! ।।५।।
ya re garibano maya
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: