श्रीमार्तंडविजय अध्याय क्र ३०
Автор: Upadhye Guruji (श्री.अण्णाश्री उपाध्ये गुरुजी.)
Загружено: 2021-08-07
Просмотров: 781
Описание: मागील अध्यायामध्ये ग्रंथकाराने कांद्या-वांग्याचे भरीत, रोडला, गोठ, दिवटी व बुधली, घोळ, खोबरे व पोवते तसेच ध्वजा यांच्याविषयीची माहिती दिली आहे. या अध्यायात ग्रंथकाराने वाचकभक्तांस तळीचा क्रम, पिठाच्या दिव्याच्या आरतीचा क्रम, बारा पौर्णिमा, शनिवार आणि रविवारच्या व्रतांचे विवरण आणि जागर यांच्याविषयी अवगत केले आहे. शनिवारच्या व्रताविषयी सांगताना ग्रंथकाराने सर्व देव-देवतांना नमस्कार, मंगलस्नान, व्रतसंकल्प, उपवास, रात्रौ हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, केशर व भंडारा, अक्षता, सुवासिक फुले. तुळशीपत्र, बेल, दूर्वा, पांढरी-तांबडी फुले, ऋतूनुसार पाच फळे व नैवद्य यांनी केलेली श्रीखंडोबा देवाची पूजा तसेच मानसपूजा कशी करावी याचे मार्गदर्शन केले आहे. तसेच हळदीचे शिवलिंग तयार करून त्याची शाखशुद्ध पूजा, नैवेद्य अर्पण, त्रयोदशगुणी विड्याचे दान, व सुवर्णमुद्रा दक्षिणादान, त्यानंतर परिवारासह कर्पूरारती झाल्यानंतर श्रद्धापूर्वक मल्हारी-महात्म्य व मल्हारी-सहस्त्रनामाचे पठण करणे, रात्री देवाजळच त्यास नमन करून निद्राधीन होणे याविषयी अवगत केले आहे. रविवारी मल्हारीचा जयजयकार करीत प्रातःकाली मंगल स्नान करावे व सुयोग्य नैवेद्य देवाला द्यावा. भाविकांना भोजन, दक्षिणा द्यावी व नमस्कार करावा, भोजनोपरांत विडा द्यावा, प्राणिमात्रांनासुद्धा अन्न द्यावे. दारासमोर आलेल्या कुणालाही विन्मुख न पाठवता त्याचा योग्य तो सन्मान करावा अशा रितीने करण्यात आलेले हे शनिवारचे मंगलदायी व सर्व मनोकामना पूर्ण करणारे व्रत वाचकभक्तांनी केल्यास त्यांस श्रीखंडोबाची कृपा प्राप्त होईल असेही ग्रंथकार नमूद करतो. रविवार हा ' मल्हारीचा वार' म्हणून प्रसिद्ध असल्याने रविवारचे महापुण्यदायी व्रत कसे करावे याची सविस्तर ग्रंथकाराने दिली आहे. अशा पद्धतीने चंपाषष्ठीस, पौष शुद्ध षष्ठीस, कृष्णाष्टमीस, माघ चतुर्दशीस, अश्विन महिन्यातील नवमीस असे व्रत करावे. त्या वेळी नैवेद्यासाठी उडीदवडे करावेत. दह्यात टाकलेली कांदा-भजी, वांग्याचे चविष्ट भरीत, रोडगा असा शास्त्रशुद्ध नैवेद्य दाखवावा. विडा व दक्षिणा देऊन सर्व लोकांना समाधानी करावे असेही कथन केले आहे. श्रीदेव खंडोबाची उपासना आणि व्रतवैकल्ये कशी करावीत हे तपशीलवार सांगताना ग्रंथकाराने तळी भरण्याचा विशिष्ट क्रम, पिठाच्या दिव्याच्या आरतीचा क्रम, तसेच बारा पौर्णिमा, आणि जागर यांच्याविषयीचीही समय माहिती वाचकभक्ताना दिली आहे. पुढील अध्यायामध्ये ग्रंथकाराने चंपाषष्ठी-स्कंदषष्ठी व्रत, घटमाळा, फुलोरा, तेल, कृष्णाष्टमी व चतुर्दशी व्रत, हिंदोळाव्रत यांच्या विषयीची माहितीने वाचकभक्तांस अवगत केले आहे.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: