ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

अधिक मास म्हणजे काय?धोंडयाचा महिना/पुरुषोत्तम मासकधीपासून कधीपर्यंत?कथा जावयाला का दिलं जातं महत्त्व

Автор: Home sweet home

Загружено: 2023-07-22

Просмотров: 276

Описание: हिंदू पौराणिक कथांमध्ये भारतीय हिंदू सणांना फार महत्व आहे. सगळेच सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदात भारतात साजरे केले जातात. हिंदू कॅलेंडरमुसार अधिक मास १८ जुलैपासून सुरू होणार असून अधिक महिना साजरा करण्यामागे नेमकी काय परंपरा आहे ते जाणून घेऊया.
पुरुषोत्तम मास म्हणजेच धोंड्याचा महिना असेही या महिन्याला संबोधले जाते, हा हिंदू कॅलेंडरमध्ये असलेला एक अतिरिक्त महिना आहे जो दर तीन वर्षांतून एकदा येतो.
अधिक महिना हा अतिशय शुभ मानला जातो. हा काळ आध्यात्मिक उपासना आणि भक्तीसाठी एक आदर्श काळ असल्याची मान्यता आहे. भगवान विष्णूला हा महिना समर्पित आहे आणि त्याच्याकडून आशीर्वाद मिळविण्यासाठी भक्त विविध धार्मिक विधी आणि प्रार्थना करतात.
प्राचीन काळापासून जेव्हा हिंदू कॅलेंडर चंद्रावर आधारित होते तेव्हा अधिक महिन्याची उत्पत्ती झाली. चंद्र आणि सौर कॅलेंडरमधील फरकामुळे, दोन कॅलेंडर समक्रमित करण्यासाठी दर तीन वर्षांनी एक अतिरिक्त महिना यात जोडला गेला.
महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील हिंदू महिने हे अमावस्येला संपणारे असतात. ज्या हिंदू महिन्यात सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करत नाही तो अधिक महिना असतो.
या अतिरिक्त महिन्यालाच अधिक महिना असे नाव देण्यात आले. हा महिना अध्यात्मिक आणि धार्मिक कार्यांसाठी अधिक महत्त्वाचा महिना मानला गेला आहे. या काळात बरेच भक्त उपवास करतात, दानधर्म करतात आणि इतर धार्मिक प्रथा परंपरा पाळतात.
अधिक महिन्याची कथा
त्रिपुरासुर राक्षसाने एकदा तिन्ही लोकांचा नाश केला अशी हिंदू पौराणिक कथेनुसार आख्यायिका आहे, मात्र देवता त्याचा पराभव करू शकले नाहीत. भगवान ब्रह्मदेवाने त्यांना भगवान विष्णूची मदत घेण्याचा सल्ला दिला, त्यांनी वराह रूप धारण केले आणि या राक्षसाचा वध केला.
त्यानंतर भगवान विष्णू चार महिने ध्यानस्थ राहिले आणि देवतांना त्यांच्या अनुपस्थितीत विश्वाच्या कल्याणाची काळजी वाटली. त्यांनी हे अंतर भरून काढण्यासाठी ब्रह्मदेवाला अतिरिक्त महिना निर्माण करण्याची विनंती केली आणि अशा प्रकारे अधिक महिना अस्तित्वात आला.
अधिकमासात जावयाला महत्व का?
अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. पुरुषोत्तम म्हणजे नारायण. विवाह प्रथेनुसार जावयाला नारायण असे संबोधले जाते. त्यानुसार विवाह संस्कार होतात. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांसाठी जावई हा नारायण असतो.
अधिक मास मराठी माहिती adhik maas 2023
काटेकोरपणाने दर तेहेतीस महिन्यांनी अधिक मास येतो. सूर्य वर्षातील १२ राशीपैकी प्रत्येक महिन्यात एकेक रास बदलतो. प्रत्येक राशीत सूर्य जातो त्याला संक्रांत म्हणतात. अशा मेष राशीपासून मीन राशीपर्यंत एका वर्षात १२ संक्रांती होतात.

चैत्र महिन्यापासून फाल्गुन महिन्यापर्यंत बारा महिन्यांत प्रत्येक महिन्यात एक संक्रांत असते. यात बदल होत होत ३३ महिन्यांनी असा महिना येतो, की त्यात संक्रांत नसते.

अलीकडच्या महिन्यात अमावस्येला संक्रांत असते आणि पुढील महिन्यात प्रतिपदेला संक्रांत येते.

त्या बिन संक्रांतीच्या महिन्याला अधिक महिना म्हणतात. अधिक महिन्याला पुढच्या महिन्याचे नाव देतात. म्हणजे भाद्रपद महिना असेल तर श्रावण महिन्यानंतर अधिक भाद्रपद महिना येतो.

अधिक महिना मोठ्या पर्वाप्रमाणे असतो व त्या महिन्यात धार्मिक कृत्ये करतात.
अधिकमासातील व्रते व नियम adhik Mahina
अधिक महिन्यात संक्रांत नसल्यामुळे चंद्रसूर्यांच्या गतीत फरक पडतो. यामुळे वातावरणातही बदल होत असतो. याचा आपल्यावर अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून काही नियम व व्रते पाळावीत. यामुळे मनुष्याला सुख, शांती, समाधान मिळते, त्यांचे इच्छित मनोरथ पूर्ण होतात, त्यांची प्रगती होते. पुढे काही व्रते व नियम दिले आहेत. त्यातील जे जमतील त्यांचे पालन करावे.
नियम
१) रोज एकदाच फलाहार करावा.
२) नक्त, भोजन करावे. (दिवसा न जेवता फक्त, रात्री पहिल्या प्रहारात एकदाच जेवावे.)
३) महिनाभर मीठ खाऊ नये.
४) रोज तेलाचा किंवा तुपाचा दिवा देवापुढे सतत तेवता ठेवावा.
५) तेहतीस अनारसे, जावयाला दान द्यावे. (अनरशांऐवजी ३३ बत्तासे, खारका, सुपाऱ्या किंवा फळे दिली तरी चालतात.)
६) रोज गोग्रास देणे.
७) हरिविजय (प्रकाशक-धार्मिक प्रकाशन संस्था) ग्रंथाचे एका महिन्यात पूर्ण पारायण करावे.
८) अधिकमास माहात्म्य पोथी (प्रकाशक- धार्मिक प्रकाशन संस्था) किंवा पुरुषोत्तममास माहात्म्य पोथी (प्रकाशक - धार्मिक प्रकाशन संस्था) यांपैकी एका ग्रंथाचे महिन्यात पूर्ण पारायण करावे.
९) भक्तकवी मिलिंद माधवकृत अधिकमास माहात्म्य या पोथीचे रोज पारायण करावे.

वरीलपैकी कोणत्याही व्रताची सुरुवात करताना अगर उद्यापनाच्या वेळी भक्तकवी मिलिंद माधवकृत अधिकमास माहात्म्याच्या एकवीस प्रती अन्य भक्तांना वाटाव्यात.
अधिकमासाची जन्मकथा | adhik maas 2023
एकदा महातपस्वी भगवान नारायण लोककल्याणासाठी तपश्चर्या करीत बसले असताना नारदमुनींची स्वारी तिथे आली.

त्यांच्या येण्याचे कारण विचारता नारदमुनी म्हणाले, हे तपस्वी श्रेष्ठा, दरवर्षी फक्त बाराच महिने असतात. मग दर तीन वर्षांनी हा तेरावा महिना कसा येतो ? कृपा करून या अधिक महिन्याची उत्पत्ती कशी झाली ते मला सांगा."

तेव्हा नारायण म्हणाले, "मुनिवर्या, विश्वाचे कल्याण अगर अकल्याण हे सत्कर्माच्या आणि दुष्कर्माच्या प्रमाणांवर अवलंबून असते.

आजकाल दुष्कृत्याचेच प्रमाण वाढल्यामुळे, ते पाप आपल्याला सहन होत नाही, अशी बाराही महिन्यांची केव्हापासूनची तक्रार होती. त्या पापाचे जड ओझे बारा महिन्यांच्या पोटांत मावेनासे झाले.

त्यामुळे त्या बाराही महिन्यांनी आपापल्या पोटांतील पापाचा फक्त तिसराच हिस्सा बाहेर काढून टाकला. आपला पापभार तेवढा कमी केला.

परंतु बाराही महिन्यांनी काढून टाकलेल्या त्या पापभागांपासून तेरावा महिना म्हणजेच अधिकमास उत्पन्न झाला.

#aadhikmass #purushottammaas #vrat #importancetoson-in-law #dhondayachamahina #aarti #facts #homesweethome .

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
अधिक मास म्हणजे काय?धोंडयाचा महिना/पुरुषोत्तम मासकधीपासून कधीपर्यंत?कथा जावयाला का दिलं जातं महत्त्व

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

© 2025 ycliper. Все права защищены.



  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности



Контакты для правообладателей: [email protected]