आधी नमन गुरुदेवाला चरणी ठेवितो माथा द्यावे दर्शन देवा आता या पामराला
Автор: Deep Arankar । आनंद दत्त सांप्रदायिक
Загружено: 2025-12-15
Просмотров: 5143
Описание:
आनंद दत्त महापूजा जांब : गुरुवर्य योगेशपुरी महाराज
आनंद आश्रम मठ जांब ता.आर्णी जि.यवतमाळ
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आधी नमन गुरूदेवाला । चरणी ठेवितो माथा ।।
द्यावे दर्शन देवा आता । या पामराला ।। धृ ।।
करू नमन अनुसयेला । अत्रऋषीला ।।
घ्यावे पदरी देवा आता । या बालकाला ।।१।।
मी अज्ञानी अपराधी देवा । नका लोटू दूर ।।
गुरु देवाच्या चरणावर । जोडीतो मी कर ।। २।।
मनी नाही भक्ती भाव । माणूस कस म्हणाव ।।
गुरुदेव दाता एक । आहे या जीवाला ।।३ ।।
अगाध आहे माझ्या । सद्गुरुची लीला ।।
दृष्ट दूर्जनांचा तेथे । भ्रम दूर झाला ।।४।।
घ्यावे पदरी देवा आता । रमणपुरीला ।।
दत्तपुरीच्या चरणी मी । देह अर्पिला ।।५।।
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: